हे सरकार गेल्यात जमा, आमचे सरकार आल्यावर जुनी पेन्शन योजना लागू करणार, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन

हे सरकार गेल्यात जमा, आमचे सरकार आल्यावर जुनी पेन्शन योजना लागू करणार, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर आहेत. त्यांनी जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी होत असलेल्या महाअधिवेशनाला ते उपस्थित होते. यावेळी त्यांनी महायुती आणि मिंध्यांवर जबरदस्त प्रहार केले. ज्यांनी विश्वासघात केला, आईसारख्या शिवसेनेवर वार केले, त्यांच्यावर जनता कसा विश्वास ठेवणार , असा सवाल करत आता हे विश्वासघताकी सरकार घालवून आपले सरकार आणण्याची गरज आहे. ही बदलाची ताकद तुमच्यात आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच आपले सरकार आल्यावर जुनी पेन्शन योजना जशी आहे तशी लागू करण्याचा शब्दही त्यांनी यावेळी दिला.

आपल्याला सत्तेची चिंता नाही, आपल्याला जनतेच्या आयुष्याची चिंता आहे. राज्यातील प्रत्येक कुटुंबियांची चिता आहे. सत्ता येते आणि जाते, गेलेली सत्ता परत येणार आहे. नक्की येणार आणि आपण खेचून आणणार. आता हे सरकार गेल्यात जमा आहे. त्यांना पेन्शन कसले त्यांना आता टेन्शन देण्याची वेळ आली आहे. आपण एकजूट राहण्याची गरज आहे. सध्या फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे. त्याला एकजूट हेच उत्तर आहे. या एकजुटीमुळे हे सरकार गेल्यात जमा आहे.

पेन्शनच्या मागणीसाठी उपोषण करू नये, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले. जनता आधीच उपाशी आहे. त्यामुळे आता उपोषण नको. सत्ताधारी सत्तेशिवाय उपाशी राहायला हवे, असे आपले आंदोलन हवे. अशा आंदोलनाचा निर्धार करा. आंदोलनाची मशाल पेटल्यावर सरकारच्या चमच्यांना त्यावर पाणी ओतायला देऊ नका. जुनी पेन्शन योजना आपल्या सर्वांनी एकत्र येत, आपले सरकार आणत अंमलात आणायची आहे. तुमचा आक्रोश त्यांच्या कानापर्यंत पोहचत नाही. त्यामुळे आता आपण सर्व येत आपले सरकार आणा, तुमची मागणी आपण मान्य करतो, हा माझा शब्द आहे, असे आश्वासनही उद्धव ठाकरे यांनी दिले.

मी तुम्हाला जुन्या पेन्शन योजनेचा शब्द दिल्यानंतर आता ते कॅबिनेट बैठकीत याबाबत निर्णय घेतील. आतापर्यंत ज्यांना बहीण होती, हे आपल्याला माहिती नव्हते, त्यांनी अचानक लाडकी बहीण योजना आणली. तसेच आता ते कॅबिनेटमध्ये याबाबत निर्णय घेतील, असा दगाफटका फक्त तुमच्याशी नाही, महाराष्ट्राशी होण्याची शक्यता आहे. ज्या शिवसेनेने यांना राजकीय जन्म दिला. शिवसेनेने ज्यांना मोठे केले. त्या आईचाच शिवसेनेचा त्यांनी विश्वासघात केला. ज्यांना मी कुटंबातले मानले होते, त्यांनी आपल्याशी विश्वासघात केला, ज्यांनी आईवर वार केला, ते तुमच्यावर वार करणार नाहीत का, असा सवालही त्यांनी केला. असे विश्वासघातकी सरकार आपल्याला नको आहे. मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न तेव्हाही नव्हते, आताही नाही. माझ्यासाठी मला माझा महाराष्ट्र महत्त्वाचा आहे. महाराष्ट्रातील जनता हीच माझी सत्ता हीच माझी ताकद आहे, असेही ते म्हणाले.

राजकारण्यांना किती पेन्शन मिळते आणि तुम्हाला किती पेन्शम मिळते, ही तफावत तुम्ही पाहिली. सरकार तुम्ही चालवत आहात. कोरोना काळात तुम्ही काम केले म्हणून राज्य वाचले. योजना सरकार जाहीर करते पण ती घराघरांत जाऊन तुम्ही राबवता. तुम्ही साथ दिली नाही, तर कोणतेच सरकार राहू शकत नाही. आता लाडकी बहीण योजना आणली पण भाऊ कोण हेच तिला कळत नाही. प्रत्येकजण मीच तुझा भाऊ, मीच तुझा भाऊ असे म्हणत आहेत. मात्र ते भाऊ नसून फुकटखाऊ आहेत. जनतेच्या पैशांवर फुकटखाऊ म्हणतात मीच तुझा भाऊ, असे सध्या सुरू आहे. योजना तुम्ही राबवता मग योजनेवर फोटो कोणाचे असतात. तुम्ही करणाऱ्या कामचे श्रेय हे उपटसुंब घेत आहेत. आपणही शेतकरी कर्जमुक्ती केली, पण त्याचा असा गाजावाजा केला नाही. आपण आपले काम केले. आता फक्त गाजावाजा होत आहे, असा हल्लाही त्यांनी चढवला.

तुम्ही 10 टक्के कापले जातात, ते त्यांच्या लाडक्या मित्रांच्या खिशात जात आहेत.अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी लोकसभेत सांगितले की, जुनी पेन्शन योजना ते लागू करणार नाहीत. त्यामुळे राज्यातील सरकारचे चेलेपेले काहीही करू शकत नाही. दिल्लीने डोळे मोठे केले की यांचे काही चालत नाही. आता निवडणुका डोळ्यासमोर ठेवत ते विविध योजना आणत आहे. योजना चांगल्या असल्या तरी तिजोरीचा विचार करायला हवा. मात्र, सरकार जनतेच्या पैशांवर योजना जाहीर करत आहेत. त्यामुळे आता त्यांना पेन्शन देऊन टाकू, त्यांना आता घरी बसवण्याची वेळ आली आहे. तुम्ही सरकार चालवू शकतात तसेच सरकार बदलूही शकतात. आता हे सरकार बदलून आपले सरकार आणण्याची वेळ झाली आहे. आपले सरकार आल्यावर जुनी पेन्शन योजना जशीच्या तशी अंमलात आणणारच, हा माझा शब्द आहे, असेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘दिघे साहेब किंग होतायत याची खुन्नस काहींना होती त्यामूळे…,’ काय म्हणाले संजय शिरसाट ‘दिघे साहेब किंग होतायत याची खुन्नस काहींना होती त्यामूळे…,’ काय म्हणाले संजय शिरसाट
आनंद दिघे यांच्या जीवनावरील धर्मवीर – 2 हा चित्रपट नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटाला विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर प्रदर्शित केले...
तो येतोय… कुणाचे बॅनर्स?, अचानक शेकडो बॅनर्स लागल्याने नवी मुंबईत चर्चांना उधाण
बेपत्ता एमसी स्टॅन?, थेट विविध शहरात लावण्यात आले पोस्टर्स, मुंबईमधून बेपत्ता झाला आणि…
IIFA Awards 2024 मध्ये जान्हवी कपूरने गळ्यात घातलेल्या नेकलेसची किंमत वाचून विस्फारतील डोळे
लग्नाच्या 10 महिन्यांतच घटस्फोट; सध्या काय करते करण सिंह ग्रोवरची पूर्व पत्नी?
शिवसेना आमदार नितीन देशमुख यांच्या मुलावर अकोल्यात हल्ला, तिघांना अटक
जम्मू-काश्मीरमधील कठुआमध्ये चकमक, एक दहशतवादी ठार तर एक जवान शहीद