भाजप आणि महायुतीचा फेक नरेटिव्ह पसरवण्याचा डाव; काँग्रेसचा हल्लाबोल

भाजप आणि महायुतीचा फेक नरेटिव्ह पसरवण्याचा डाव; काँग्रेसचा हल्लाबोल

राज्यातील महायुती सरकार आणि भाजप फेक नरेटिव्ह परसवण्याचा प्रयत्न करत आहे, असा हल्ला काँग्रेसने महायुती सरकार आणि भाजपवर चढवला आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जनतेत फेक नरेटिव्ह पसरवत आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. कर्नाटकातील एका घटनेचे फोटो ट्विट करत जनतेत फेक नरेटिव्ह पसरवण्यात येत आहे. याबाबत काँग्रेसने महायुती आणि भाजपवर हल्ला चढवला आहे.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कर्नाटकातील एका घटनेबाबत खोटी माहिती पसरवून सणासुदीच्या काळात राज्यात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचे पटोले यांनी सांगितले. याबाबत केलेल्या ट्विटमध्ये पटोले यांनी म्हटले आहे की, राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कर्नाटकातील एका घटनेबद्दल खोटी माहिती पसरवून सणासुदीच्या काळात राज्यात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजप आणि महायुती फेक नॅरेटिव्ह बनवण्याचा प्रयत्न करत आहे. अगोदर राहुलजी गांधी यांच्याबद्दल स्वतःच फेक न्यूज पसरवून आंदोलन करत होते. आता कर्नाटकातील एका घटनेबद्दल खोटी माहिती देऊन फेक न्यूज पसरवून राज्यात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण राज्यातील सुज्ञ जनता यांचा डाव यशस्वी होऊ देणार नाही. जनतेला यांचा खरा चेहरा माहित आहे.

या बाबत बाळासाहेब थोरात यांनीही टिव्ट करत महायुती आणि भाजपवर हल्लाबोल केला. राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फेक न्यूजची फॅक्टरी चालवत आहेत का, असा संतप्त सवाल थोरात यांनी केला. याबाबत केलेल्या ट्विटमध्ये थोरात यांनी म्हटले आहे की, राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फेक न्यूजची फॅक्टरी चालवत आहेत का?
सातत्याने खोट्या बातम्या पसरवून फेक नॅरेटिव्ह तयार करणे एवढेच एकच काम मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पूर्ण वेळ करत आहेत. अगोदर राहुल गांधींनी आरक्षणाबाबत जे वक्तव्य केलेच नाही त्याबद्दल फेक न्यूज पसरवून आंदोलनाची नौटंकी केली आणि आता कर्नाटकात जे घडलेच नाही त्याबाबत फेक न्यूज पसरवून राज्यात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. राज्यातील जनता सुज्ञ असून तुमच्या फेक नॅरेटीव्ह सोबत तुमचेही सरकारही उखडून फेकल्याशिवाय राहणार नाही, असेही थोरात यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

“ही माझी आई आहे..”; दिलजीत दोसांझने 15 वर्षांच्या करिअरमध्ये पहिल्यांदा दाखवला आईचा चेहरा “ही माझी आई आहे..”; दिलजीत दोसांझने 15 वर्षांच्या करिअरमध्ये पहिल्यांदा दाखवला आईचा चेहरा
दिलजीत दोसांझ हे नाव आता फक्त पंजाबी गाण्यांच्या चाहत्यांपुरतंच मर्यादित राहिलेलं नाही. टेलर स्विफ्ट, कोल्डप्ले, एड शिरीन, बीटीएस यांसारख्या आंतरराष्ट्रीय...
‘बिग बॉस मराठी’ फेम इरिना रूडाकोवा झळकणार मराठी मालिकेत
घटस्फोटानंतर परत प्रेमात पडला हनी सिंह?, गर्लफ्रेंडच्या हातामध्ये हात टाकून…
IIFA 2024: वयाच्या 69 व्या वर्षी रेखा यांचा भन्नाट डान्स, अभिनेत्रीच्या चेहऱ्यावरील भाव, दिलखेच अदा आणि…
डिप्रेशनमध्ये अनेक वर्ष, आईनेच केला सांभाळ, अखेर अभिनेत्रीने ‘तो’ खुलासा करत…
‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ फेम अभिनेता दिवाळखोरीत; शेतीची वाट धरून ‘शार्क टँक इंडिया’मध्ये दिलं ऑडिशन पण..
Deepika Padukone हिच्या लेकीच्या प्रकृतीबद्दल मोठी अपडेट समोर, अभिनेत्रीची आई म्हणाली…