Yavatmal News – तहसीलदारांनी जपले सामाजिक दायित्व; भटक्या विमुक्तांना आणले समाजाच्या मुख्य प्रवाहात

Yavatmal News – तहसीलदारांनी जपले सामाजिक दायित्व; भटक्या विमुक्तांना आणले समाजाच्या मुख्य प्रवाहात

एकीकडे आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला तरी पारधी, नाथजोगी आणि कोलाम समाज यातील बहुतांश नागरिक हे देशाच्या मुख्य प्रवाहात आलेच नाहीत. कायमच गावकुसाच्या परिघाबाहेर राहून शोषणाला बळी पडणाऱ्या या समुदायावर पराकोटीची गरीबी, सततचं विस्थापन आणि त्यांच्या मानवी हक्कांची पायमल्ली केली गेली. पण त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणायचे काम यवतमाळ जिल्ह्यातील आर्णीचे तहसीलदार वैशाख वाहुरवाघ करीत आहेत.

भारत स्वतंत्र्य झाल्यानंतर शासन व्यवस्था उदयास आली. मात्र आजही देशातील 30 टक्के नागरिकांकडे शासनाच्या योजना घेण्यासाठी लागणारी अत्यावश्यक प्रमाणपत्रे उपलब्ध नाहीत. यामुळे अनेक कुटुंब शासनाकडून मिळणाऱ्या विविध कल्याणकारी योजनापासून वंचित आहेत. परंतु सर्वसामान्य उपेक्षीत नागरिकांकडे कोणीही जातीने लक्ष देत नसल्याने शासनाच्या योजनेसाठी पात्र असूनही कागदपत्राच्या अभावी अनेक कुटुंब वंचित राहत आहेत.

याची माहिती कर्तव्यदक्ष तहसीलदार वैशाख वाहुरवाघ यांना मिळताच त्यांनी प्रत्येक गावात जावून महसूल सप्ताह राबविण्यास सुरवात केली. प्रमाणपत्रापासून वंचित असलेल्या नागरिकांना आधारकार्ड, जन्मदाखला, जात प्रमाणपत्र, अधिवास दाखले, रेशनकार्ड आदी महत्वाची प्रमाणपत्रे त्यांनी उपलब्ध करून देण्याचा विडा उचलला आहे. त्यांनी गावातील नागरिकांना प्रत्यक्ष मार्गदर्शन करुन प्रमाणपत्राचे वाटप केले.

एका पोडावर तर त्यांनी एकाचवेळी नाथजोगी समाजाचा ५६ कुटुंबाना रेशनकार्ड उपलब्ध करून दिले. त्यांना तात्काळ रेशन वाटपास सुरवात पण केली. आतापर्यंत त्यांनी जवळपास 200 जणांना आधारकार्ड देऊन या भटक्या जमातीतील नागरिकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणले आहे. यामुळे त्यांना सरकारच्या विविध योजनांचा फायदा होणार आहे ज्यांपासून ते आजपर्यंत विनमुख होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

फडणवीसांच्या कार्यालयात तोडफोड, लाडकी बहीण चिडल्याची विरोधकांची टीका फडणवीसांच्या कार्यालयात तोडफोड, लाडकी बहीण चिडल्याची विरोधकांची टीका
उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात तोडफोड करणाऱ्या या महिलेचं नाव धनश्री सहस्रबुद्धे आहे. महिलेचं मानसिक संतुलन बिघडलेले असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. दादरमध्ये राहणाऱ्या...
बिग बॉसच्या 18वा सीझनमध्ये सलमान खानसोबत दिसणार हा कॉमेडियन
मुख्यमंत्र्यांचे आश्वासन फोल, विविध मागण्यांसठी उमेद संघटनेचा रत्नागिरीत मोर्चा
मोठी बातमी! केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राज्याचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांची कानउघाडणी
तो सीन आणि ते नावही वगळा; कंगनाच्या ‘एमर्जन्सी’तील 13 सीनला सेन्सॉर बोर्डाची ‘एमर्जन्सी’ कात्री
सूचना का पाळल्या नाही? तीन वेळा स्मरणपत्र पाठवूनही उत्तर नाही; अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून निवडणूक आयोगाचा संताप, भाजप-मिंधे सरकारवर ताशेरे
उज्जैनमध्ये महाकाल मंदिराजवळ भिंत कोसळली, ढिगाऱ्याखाली अनेक जण दबल्याची भीती