Lalbaugh Ganpati : लालबागमध्ये विसर्जन मिरवणुकीत राडा, पोलिसाने ट्रकवर चढून मारलं, VIDEO

Lalbaugh Ganpati : लालबागमध्ये विसर्जन मिरवणुकीत राडा, पोलिसाने ट्रकवर चढून मारलं, VIDEO

लालबागमध्ये गुरुवारी रात्री विसर्जन मिरवणुकी दरम्यान मोठा राडा झाला. काल गौरी-गणपती विसर्जन होतं. यावेळी खटाव बिल्डिंग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या विसर्जन मिरवणुकी दरम्यान मोठा वाद झाला. डीजे सिस्टिम बंद करण्यावरुन या सर्व वादाला सुरुवात झाली. एका पोलिसाने डीजे ऑपरेट करणाऱ्या तरुणाला मारहाण केली. त्याचं सामान उचलून घेऊन गेले. त्यावरुन लालबागमधील खटाव बिल्डिंगचे रहिवाशी, नागरिक रस्त्यावर आंदोलनाला बसले. विसर्जन मिरवणूक पुढे नेणार नाही अशी आक्रमक भूमिका घेतली. वाद वाढल्यानंतर स्थानिक आमदार अजय चौधरी, खासदार अरविंद सावंत तिथे पोहोचले. त्यांनी मध्यममार्ग काढण्याचा प्रयत्न केला.

“आम्ही पोलिसांना सहकार्य करत होतो. पोलिसांनी सांगितल्यानंतर आम्ही आमचा डीजे बंद केला. पण या दरम्यान दोन पोलिसवाल ट्रकमध्ये चढले. त्यांनी लाथ मारुन स्पीकर खाली पाडला. दुसऱ्या पोलिसाने डीजे ऑपरेटरला लाथा-बुक्क्यानी मारहाण केली” असं स्थानिक नागरिक अभय घाग यांनी सांगितलं. या प्रकारावरुन नागरिक प्रचंड संतापले. मारहाण करणारे पोलीस माफी मागत नाहीत तसेच घेऊन गेलेल्या वस्तू परत आणून देत नाहीत, तो पर्यंत जागेवरुन हलायच नाही अशी भूमिका घेत तिथेच ठिय्या मांडला.

‘वातावरण का बिघडवताय?’

“इतकं ताणून धरण्याची गरज नव्हती. घड्याळाच्या काट्यावर दहा मिनिटं, एक मिनटं असं बघण्याची गरज नाही. तुम्ही त्यांची जी वस्तू घेऊन गेलायत, ती परत आणून द्या. वातावरण का बिघडवताय? तुम्ही ऐकत नसाल, तर आम्ही त्यांच्यासोबत आहोत” असं स्थानिक खासदार अरविंद सावंत म्हणाले. खटाव बिल्डिंग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच हे 99 व वर्ष आहे. पुढच्यावर्षी मंडळाच शतक महोत्सवी वर्ष आहे. लालबागमधील हे लालबागचा राजा, मुंबईचा राजा यापेक्षा हे जुन मंडळ आहे. मंडळाने नेहमीच चांगले सामाजिक उपक्रम राबवले आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मुंबईत ताकद ठाकरेंचीच! युवासेनेच्या शिलेदारांनी विरोधकांना अक्षरश: धूळ चारली मुंबईत ताकद ठाकरेंचीच! युवासेनेच्या शिलेदारांनी विरोधकांना अक्षरश: धूळ चारली
मुंबई विद्यापीठ नोंदणीकृत पदवीधर मतदार संघाच्या मतमोजणीत OBC प्रवर्गातून युवासेनेचे उमेदवार मयूर पांचाळ यांचा विजय झाला. सर्वात आधी मयूर पांचाळ...
सैफ अली खान याने केले राहुल गांधीबद्दल अत्यंत मोठे भाष्य, म्हणाला, देशाला…
ऐश्वर्या राय हिच्यावर प्रश्नांचा भडीमार, लोक संतापले, म्हणाले, कधीतरी…
मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीत आतापर्यंत युवासेनेने 10 पैकी 8 जागा जिंकल्या, शशिकांत झोरे यांची हॅट्ट्रिक
जमीन घोटाळाप्रकरणी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्यांविरोधात FIR दाखल
पंतप्रधान ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात त्याला उपमुख्यमंत्री करतात; केजरीवालांची मोदींवर घणाघाती टीका
विधानसभा निवडणूक निःपक्षपातीपणे पार पाडण्यासाठी रश्मी शुक्लांनापदावरून हटवा; काँग्रेसचं निवडणूक आयोगाला पत्र