अंबरनाथमध्ये केमिकल फॅक्टरीतून वायू गळती, नागरीकांच्या डोळ्यांना आणि घशाला त्रास

अंबरनाथमध्ये केमिकल फॅक्टरीतून वायू गळती, नागरीकांच्या डोळ्यांना आणि घशाला त्रास

ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथमध्ये एका केमिकल कंपनीच्या फॅक्टरीमधून वायू गळती झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण  आहे. केमिकलचा धूर संपूर्ण शहरात पसरल्याने शहरात धुक्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. हवेत वायू पसरल्याने घसा खवखवणे आणि डोळ्यात जळजळ होण्याच्या तक्रारी नागरीकांमधून येऊ लागल्या. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली. सध्या या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

व्हिडीओमध्ये रस्ते धुराने भरलेले दिसत आहेत. जे लोक संपर्कात आली आहेत त्यांनी नाक-तोंड झाकले आहे. संपूर्ण परिसर धुराने व्यापलेला दिसत आहे. एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, हा वायू रेल्वे स्टेशनपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत लोक शहर सोडून जाण्याची शक्यता संपुष्टात आली आहे. गळतीचे कारण शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पथकेही पाठवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. अधिकाऱ्यांनी नागरीकांना घरातच राहण्याचे आवाहन केले आहे.

मोरिवली एमआयडीसी परिसरात 12 सप्टेंबर रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास उग्र वास येऊ लागला. त्यामुळे अनेक नागरीकांना त्याचा त्रास होऊ लागला. दरम्यान, अग्निशमन दलाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली असता एमआयडीसीतील एकाही कंपनीतून वायू सोडण्यात आला नसल्याचे सांगण्यात आले. मात्र, शहरात धुराचे लोट पसरल्याने नागरीकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, निक्केम केमिकल कंपनीचे रसायन हवेत पसरल्याने नागरीकांना आरोग्याच्या तक्रारींना सामोरे जावे लागले. अनेकांना घसादुखी आणि डोळ्यांची जळजळ होऊ लागली. सध्या वायू प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मोबाईल व्हॅनद्वारे वायू प्रदूषणावर लक्ष ठेवले जात आहे. नेमका वायू कोणता? याचा तपास सुरू आहे. परिस्थिती नियंत्रणात असून घाबरून जाण्याची गरज नसल्याचेही प्रशासनाने म्हटले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मुंबईत ताकद ठाकरेंचीच! युवासेनेच्या शिलेदारांनी विरोधकांना अक्षरश: धूळ चारली मुंबईत ताकद ठाकरेंचीच! युवासेनेच्या शिलेदारांनी विरोधकांना अक्षरश: धूळ चारली
मुंबई विद्यापीठ नोंदणीकृत पदवीधर मतदार संघाच्या मतमोजणीत OBC प्रवर्गातून युवासेनेचे उमेदवार मयूर पांचाळ यांचा विजय झाला. सर्वात आधी मयूर पांचाळ...
सैफ अली खान याने केले राहुल गांधीबद्दल अत्यंत मोठे भाष्य, म्हणाला, देशाला…
ऐश्वर्या राय हिच्यावर प्रश्नांचा भडीमार, लोक संतापले, म्हणाले, कधीतरी…
मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीत आतापर्यंत युवासेनेने 10 पैकी 8 जागा जिंकल्या, शशिकांत झोरे यांची हॅट्ट्रिक
जमीन घोटाळाप्रकरणी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्यांविरोधात FIR दाखल
पंतप्रधान ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात त्याला उपमुख्यमंत्री करतात; केजरीवालांची मोदींवर घणाघाती टीका
विधानसभा निवडणूक निःपक्षपातीपणे पार पाडण्यासाठी रश्मी शुक्लांनापदावरून हटवा; काँग्रेसचं निवडणूक आयोगाला पत्र