श्री सिद्धिविनायकाच्या अलंकाराचा सोमवारी लिलाव
मुंबईसह देश-विदेशातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायकाच्या चरणी भक्तांनी अर्पण केलेल्या सोन्याच्या अलंकारांचा जाहीर लिलाव श्री गणेशोत्सवाच्या कालावधीत सोमवार 16 सप्टेंबर रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत मंदिराच्या आतील परिसरात आयोजित करण्यात आला आहे. श्रीगणेश प्रतिमा, लॉकेट्स, मोदक, अंगठय़ा, सोन्याच्या साखळ्या, हार आदी अलंकारांचा लिलाव करण्यात येणार आहे. लिलावासाठी उपलब्ध असलेले अलंकार लिलावा दिवशी मंदिराच्या आवारात प्रदर्शनार्थ ठेवण्यात येतील. तसेच भारत सरकार टांकसाळ यांच्याकडून बनवून घेतलेली श्री सिद्धिविनायकाची प्रतिमा असलेली 999 प्रतिची शुद्ध चांदीची नाणी 11 ग्रॅम, 21 ग्रॅम व 51 ग्रॅम वजनाची विक्रीकरिता उपलब्ध आहेत. श्री सिद्धिविनायकाच्या भक्तांनी या लिलावात मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे, असे न्यास व्यवस्थापन समितीने आवाहन केले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List