मुंबईवरून महाविकास आघाडीत घमासान; शरद पवार, उद्धव ठाकरेंच्या मागणीने काँग्रेसला फुटला घाम

मुंबईवरून महाविकास आघाडीत घमासान; शरद पवार, उद्धव ठाकरेंच्या मागणीने काँग्रेसला फुटला घाम

मुंबईचं वातावरण महाविकाससाठी अनुकूल असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. महायुतीसाठी लोकसभेसारखेच आव्हान कायम असल्याचे ते म्हणाले. पण सूत्रांच्या माहितीनुसार मुंबईत जागा वाटपावरुन काँग्रेसमध्ये अस्वस्थता आहे. मुंबईतील 36 विधानसभा जागांवरुन पेच निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार यांच्याकडील जागांचे गणित पाहता काँग्रेसे आक्रमक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

काय आहे पेच

सूत्रांच्या माहितीनुसार, शिवसेना उद्धव ठाकरे गटाने मुंबईतील 36 विधानसभा जागांपैकी 21 जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. तर शरद पवार गट 7 जागांसाठी आग्रही आहे. या सर्व कवायतीत काँग्रेसच्या वाट्याला अवघ्या 8 जागा उरत आहेत. त्यामुळे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर वाढला आहे. नवभारत टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, शरद पवार गट मुंबईतील अंधेरी वेस्ट, वर्सोवा, कुर्ला, अणुशक्ति नगर, दहिसर, घाटकोपर पूर्व आणि घाटकोपर पश्चिम या जागांची मागणी करत आहे.

काँग्रेसचा दावा काय?

आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी 288 पैकी 180 पेक्षा अधिक जागा मिळतील असा दावा काँग्रेस नेत बाळासाहेब थोरात यांनी गुरूवारी, 12 सप्टेंबर रोजी केला. महाविकास आघाडीत राज्यातील 125 जागांवर सहमती झाल्याचा दावा त्यांनी केला. तर इतर जागांवर चर्चा सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. महाराष्ट्रात महाविकास आघाडीतील काँग्रेस, उद्धव ठाकरे गट, शरद पवार गट यांनी लोकसभेप्रमाणे विधानसभेत चमत्कार करण्यासाठी चंग बांधला आहे.

मुंबईत महाविकास आघाडी मजबूत

दरम्यान नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी मुंबईत महाविकास आघाडी मजबूत स्थितीत आहे, असा दावा केला आहे. मुंबईत महायुतीसाठी आव्हान उभं राहिले असे ते म्हणाले. त्यांनी महाविकास आघाडीतील जागा वाटपासंबंधी कोणतेही वक्तव्य केलेले नाही. पण महाविकास आघाडीत 125 जागांवर सहमती झाल्याचा दावा करण्यात येत आहे. तर  महायुतीसाठी कोणतीही जागा अजिंक्य नाही असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले. तर महाविकास आघाडी विजयासाठी मेहनत घेणार असल्याचे सांगितले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

सिनेट निवडणुकीत ठाकरे गटाचा दणका, भाजप खासदाराच्या बहिणीचा दारुण पराभव, वाचा A टू Z निकाल सिनेट निवडणुकीत ठाकरे गटाचा दणका, भाजप खासदाराच्या बहिणीचा दारुण पराभव, वाचा A टू Z निकाल
मुंबई विद्यापीठाच्या बहुप्रतिक्षित सिनेट निवडणुकींचा निकाल आज अखेर समोर येत आहे. ही निवडणूक गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत होती. निवडणूक वारंवार...
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत युवा सेनेची मुसंडी; 10 पैकी इतक्या जागांवर दणदणीत विजय
हे एखादे षडयंत्र तर नाही ना? देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाची तोडफोड; चित्रा वाघ यांचा इशारा कुणाकडं?
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा पहिला निकाल जाहीर, कोणी मारली बाजी?
देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाची तोडफोड करणाऱ्या महिलेला करायचं सलमान खानशी लग्न? भाजप पदाधिकारीचा दावा
पतीचे दुसऱ्या महिलेसोबत प्रेमसंबंध, पत्नीने घटस्फोट मागितला म्हणून अ‍ॅसिड फेकले
महाराष्ट्र महाराजांचा अपमान सहन करणार नाही! गाण्याच्या माध्यमातून फडणवीसांच्या राजीनाम्याची काँग्रेसची मागणी