Malaika Arora : वडिलांच्या निधनानंतर खचलेल्या मलायकाचे सलमानने केलं सांत्वन – Video

Malaika Arora : वडिलांच्या निधनानंतर खचलेल्या मलायकाचे सलमानने केलं सांत्वन –  Video

अभिनेत्री मलायका अरोरा हिचे वडील अनिल मेहता यांनी दोन दिवसांपूर्वी ( 11 सप्टेंबर) आयुष्य संपवलं.त्यांच्या निधनामुळे संपूर्ण कुटुंबाला धक्का बसला असून चित्रपटसृष्टीतही खळबळ माजली. वडिलांच्या निधनानंतर मलायका, अमृता आणि तिची आई अतिशय खचली असून संपूर्ण सिनेसृष्टी त्यांच्या सांत्वनासाठी एकवटली. मलायकाचा माजी पती अरबाझ आणि संपूर्ण खान कुटुंबही तिला धीर देण्यासाठी उपस्थित होते. मात्र या सर्वांदरम्यान अभिनेता सलमान खान कुठेही दिसला नव्हता, त्यामुळे विविध चर्चा सुरू होत्या. पण कामामुळे सलामन येऊ शकला नव्हता. अखेर काल सलमानने मलायकाच्या घरी जाऊन तिचं सांत्वन केलं, कुटुंबाला धीर दिला. त्याचा हा व्हिडीओ प्रचंड चर्चेत आहे.

सोशल मीडियावर मलायकाच्या घराखालचा व्हिडीओ व्हायरल झाला असून 12 सप्टेंबरच्या ( गुरूवारी) रात्री सलमानने मलायकाच्या घरी जाऊन तिची भेट घेतली. तिच्या वडिलांना श्रद्धांजली वाहिली, कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचेही सांत्वन केलं. आपल्या भावाच्या माजी पत्नीच्या घरी पोहोचलेला सलामना ब्लॅक शर्ट व जीन्स घालून एंट्री करताना दिसला. त्याच्या या भेटीने दोघांमधील मतभेद, दुरावा आता मिटला का अशी चर्चाही सुरू झाली आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

आत्तापर्यंत कुठे होता सलमान खान

‘सिकंदर’ या आगामी चित्रपटामुळे सलमान खान व्यस्त असून,त्याच्या शूटिंगनिमित्तच तो बाहेर गेला होता. मलायकाच्या वडिलांचे निधन झाले तेव्हाही तो शूटिंग करत होता, त्यामुळेच तो अंत्यसंस्कारावेळीही उपस्थित नव्हता. काही काळापूर्वी चित्रपटातील मुख्य अभिनेत्री रश्मिका मंदानाने इन्स्टाग्रामवर शुटिंगचीछोटीशी झलक शेअर केली होती. त्यावरूनच सलमानही शूटिंगसाठी बाहेर होता असा अंदाज वर्तवला जात आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

या कलाकारांनी अंत्यसंस्काराला लावली हजेरी

मलायकाच्या वडीलांनी निल मेहता यांनी बुधवारी सकाळी त्यांच्या राहत्या इमारतीवरून उडी मारून आयुष्य संपवलं. मृत्यूपूर्वी त्यांनी मुलगी अमृता अरोरा हिला शेवटचा फोन केला होता, मी आजारी आहे, थकलोय असं ते तिला म्हणाल्याच तपासात समोर आलंय. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत. मलायकाच्या आईला या घटनेमुळे खूप मोठा धक्का बसला आहे. अनिल यांनी आत्महत्या केल्याचं त्यांनी जबाबात नाकारलं आहे.

वडिलांच्या निधनाची बातमी समजली तेव्हा मलायका पुण्यात होती, ती तातडीने मुंबईच्या दिशेने रवाना झाली. 12 सप्टेंबर रोजी मलायकाच्या वडिलांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी अरोरा कुटुंबासोबत अनेक कलाकार उपस्थित होते. मलायकाच्या खास मैत्रिणी करीना कपूर खान, करिश्मा कपूर , सैफ अली खान, मलायकाचा माजी पती अरबाज खान, त्याची पत्नी शूरा , तसेच मलायकाचा एक्स- बॉयफ्रेंड अर्जुन कपूर हेही उपस्थित होते. त्यानंतर अभिनेता शाहरुख खान, गौरी खान यांनीही मलायकाच्या घरी जाऊन तिची भेट घेतली, सोशल मीडियावर तो व्हिडीओही शेअर झाला आहे. तसेच फराह थखान, साजिद खान, भावना पांडे यांनीही तिची भेट घेऊन सांत्वन केलं.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

सिनेट निवडणुकीत ठाकरे गटाचा दणका, भाजप खासदाराच्या बहिणीचा दारुण पराभव, वाचा A टू Z निकाल सिनेट निवडणुकीत ठाकरे गटाचा दणका, भाजप खासदाराच्या बहिणीचा दारुण पराभव, वाचा A टू Z निकाल
मुंबई विद्यापीठाच्या बहुप्रतिक्षित सिनेट निवडणुकींचा निकाल आज अखेर समोर येत आहे. ही निवडणूक गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत होती. निवडणूक वारंवार...
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत युवा सेनेची मुसंडी; 10 पैकी इतक्या जागांवर दणदणीत विजय
हे एखादे षडयंत्र तर नाही ना? देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाची तोडफोड; चित्रा वाघ यांचा इशारा कुणाकडं?
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा पहिला निकाल जाहीर, कोणी मारली बाजी?
देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाची तोडफोड करणाऱ्या महिलेला करायचं सलमान खानशी लग्न? भाजप पदाधिकारीचा दावा
पतीचे दुसऱ्या महिलेसोबत प्रेमसंबंध, पत्नीने घटस्फोट मागितला म्हणून अ‍ॅसिड फेकले
महाराष्ट्र महाराजांचा अपमान सहन करणार नाही! गाण्याच्या माध्यमातून फडणवीसांच्या राजीनाम्याची काँग्रेसची मागणी