Share market news – शेअर बाजारात अचानक तेजी, निर्देशांक 1500 अंक उसळला, निफ्टीनंही रचला इतिहास

Share market news – शेअर बाजारात अचानक तेजी, निर्देशांक 1500 अंक उसळला, निफ्टीनंही रचला इतिहास

शेअर बाजारामध्ये गुरुवारी दुपारनंतर अचानक तेजी आली आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक (सेन्सेक्स) जवळपास 1500 अंक उसळला आणि थेट 83000 पार पोहोचला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांकानेही (निफ्टी) इतिहास रचला. निफ्टीमध्ये 500 अंकांची वाढ होऊन तो 25,429 या ऑल टाइम हायवर गेला. निफ्टी 50 मधील जवळपास सर्वच शेअरमध्ये मोठी वाढ दिसून आली आहे.

जागतिक बाजारातून सकारात्मक संकेत मिळाले. याचा थेट परिणाम हिंदुस्थानच्या शेअर बाजारावरही झाला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सुरुवातीला 400 अंकांनी वाढला. तर निफ्टीनेही 100 अंकांची उसळी घेतली. मात्र दुपारी 3 वाजल्यानंतर बाजारात अचानक तुफान तेजी आली. सेन्सेक्स आणि निफ्टीने ऐतिहासिक झेप घेत नवीन रेकॉर्डची नोंद केली.

बातमी लिहिपर्यंत सेन्सेक्स 1520.59 अंक वधारून 83043 वर गेला, निफ्टीमध्येही 511 अंकांची वाढ होऊन तो 25422 वर पोहोचला होता. शेअर बाजारामध्ये अचानक आलेल्या तेजीचा फायदा गुंतवणूकदारांना झाला आहे.

लार्जकॅप कंपन्यांचे शेअरही तुफान वाढले आहेत. भारती एअरटेलचा शेअर 4.38 टक्के वधारून 1647 रुपयांवर, तर हिंडाल्कोचा शेअर 4.37 टक्के वाढीसह 676 रुपयांनी ट्रेड होत होता. यासह एनएमडीसीचा शेअर 4.35 टक्के, एलआयसी हाऊसिंगचा शएअर 4.03 टक्के, मॅक्स हेल्थच्या शेअरमध्ये 4 टक्के वाढ नोंदवण्यात आली.

तसेच एचडीएफसी बँक, एनटीपीसी, महिंद्र अँड महिंद्रा, अदानी पोर्ट, एल अँड टी, टाटा स्टील, कोटक बँक, एसबीआय, टेक महिंद्रा सारखे शेअरही जवळपास 2 ते 4 टक्के वाढले. यामुळे गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा फायदा झाला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

ओशिवऱ्यातील एका घरासाठी 765 अर्ज, पुनर्विकास प्रकल्पातून मिळालेल्या घरांना जोरदार मागणी ओशिवऱ्यातील एका घरासाठी 765 अर्ज, पुनर्विकास प्रकल्पातून मिळालेल्या घरांना जोरदार मागणी
म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या यंदाच्या सोडतीत पुनर्विकास प्रकल्पातून म्हाडाला मिळालेल्या 370 घरांना जोरदार मागणी असल्याचे दिसतेय. 33(5) अंतर्गत या योजनेतील ओशिवरा...
संयुक्त राष्ट्रे सुरक्षा परिषद कायम सदस्यत्वासाठी फ्रान्सचा हिंदुस्थानला पाठिंबा
मिंधे सरकारचे थोबाड फुटले… भ्रष्टाचाराच्या मतलबी वाऱ्यामुळे कोसळला राजकोट येथील छत्रपती शिवरायांचा पुतळा!
कर्नाटकात सीबीआयला नो एण्ट्री
आरोप सार्वजनिक हितासाठीच, पण तक्रारदाराला मानसिक वेदना झाल्यात म्हणून मानहानी प्रकरणात न्यायालयाने संजय राऊत यांना दोषी ठरवले
असा बिनकामाचा मुख्यमंत्री देशाने कधी पाहिला नसेल, मुंबईकरांच्या पाऊसकोंडीवरून आदित्य ठाकरे मिंध्यांवर बरसले
Maharashtra Assembly Election : विधानसभेची लगबग सुरू, केंद्रीय निवडणूक आयोगाचे पथक मुंबईत