नालेसफाईची निविदा प्रक्रिया आचारसंहितेच्या कचाट्यात अडकली

नालेसफाईची निविदा प्रक्रिया आचारसंहितेच्या कचाट्यात अडकली

पावसाळा अवघ्या पंधरा दिवसांवर येऊन ठेपला आहे. तरीही अद्याप शहरातील ओढे व नाल्यांच्या साफसफाईचे काम सुरू झालेले नाही. महापालिकेने राबवलेली निविदा प्रक्रियाही आचारसंहितेच्या कचाटय़ात सापडली आहे. लोकसभा निवडणुकीचे मतदान होऊनही अद्याप आचारसंहिता शिथिल न झाल्याने निविदा मंजुरीला परवानगी मिळण्यासाठी महापालिका जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर करणार आहे.

दरवर्षी पावसाळ्यात ओढे-नाल्यांतील गाळ व त्यावरील अतिक्रमणे, वळवलेले व बंदिस्त केलेले प्रवाह यामुळे अनेक भागातील घरात पावसाचे पाणी घुसण्याचे प्रकार घडतात. याबाबत महापालिकेने सर्वेक्षणही केलेले आहे. त्यानुसार शहरातील 41 नैसर्गिक ओढे-नाल्यांवर अतिक्रमण झाल्याचे किंवा त्यावर बंद पाईप टाकून ते बंदिस्त करण्यात आल्याचे, नैसर्गिक प्रवाह वळवण्यात आल्याचे मनपाने सादर केलेल्या अहवालात उघड झाले आहे.

नगर शहरात एकूण 95 किमी लांबीचे ओढे-नाले आहेत. तसेच मनपाच्या पथकाने केलेल्या पाहणीत शहरात 140 ठिकाणी पाणी तुंबत असल्याचे आढळून आले होते. हे प्रवाह मोकळे करण्यासह ओढे व नाल्यातील गाळ काढण्याचे काम पावसाळा सुरू होण्यापूर्वी करणे अपेक्षित आहे. महापालिकेने या कामासाठी सुमारे 41.35 लाख रुपये खर्चाची निविदाही काढली आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता अद्यापि कायम असल्याने ही निविदा मंजूर होऊ शकलेली नाही. अत्यावश्यक बाब म्हणून ही निविदा मंजूर करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेण्यात येणार आहे. त्यानंतर नालेसफाईचे काम सुरू होणार आहे. दरम्यान, पावसाळा 15 दिवसांवर येऊन ठेपल्याने त्यापूर्वी सर्व ओढे-नाल्यातील गाळ काढण्याचे व बंदिस्त प्रवाह मोकळे करण्याचे आव्हान महापालिकेसमोर आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाची तोडफोड करणाऱ्या महिलेच्या घराबाहेर पोलीस, काय घडतंय? देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाची तोडफोड करणाऱ्या महिलेच्या घराबाहेर पोलीस, काय घडतंय?
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयात तोडफोड करणाऱ्या महिलेच्या घराबाहेर आता पोलीस पोहोचले आहेत. पोलिसांचा मोठा फौजफाटा, महिला पोलीस तिथे...
Akshay Shinde Encounter : अक्षय शिंदेच्या मृतदेहाचं काय होणार? कोर्टाने काय म्हटलं? सुनावणीवेळी काय घडलं?
Akshay Shinde : इथं अफजल खानचा मृतदेह दफन झाला; मग आमच्यासाठी ही टाळाटाळ का? अक्षय शिंदे याच्या वकिलांचा सरकारी यंत्रणावर संताप; महाराजांच्या शिकवणीची करून दिली आठवण
‘श्वास’ फेम दिग्दर्शक संदीप सावंत यांचा नवा चित्रपट; ‘ह्या गोष्टीला नावच नाही’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांची नात अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार? म्हणाली…
निक्कीच्या आईने अरबाजबद्दल केला मोठा खुलासा; अभिनेत्रीला बसला मोठा धक्का
रत्नदुर्ग किल्यावर उभारण्यात येणाऱ्या शिवसृष्टीमध्ये सीसीटीव्ही आणि सुरक्षा रक्षक तैनात ठेवा; राष्ट्रवादीची मागणी