मोदी’राज’मध्ये हिंदुस्थान कर्जात बुडाला, 14 पंतप्रधानांनी केलं नाही ते मोदींनी ‘करून दाखवलं’!

मोदी’राज’मध्ये हिंदुस्थान कर्जात बुडाला, 14 पंतप्रधानांनी केलं नाही ते मोदींनी ‘करून दाखवलं’!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेत येण्यापूर्वी देशाला ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवले. हे स्वप्न तर पूर्ण झालेच नाही उलट गेल्या 10 वर्षांमध्ये देशात महागाई, बेरोजगारी वाढली. एवढेच नाही तर मोदी सरकारच्या कार्यकाळामध्ये देश कर्जाच्या खाईत बुडाल्याचे समोर आले आहे. जगामध्ये कर्जात बुडालेल्या ‘टॉप 10’ देशांमध्ये हिंदुस्थान आठव्या क्रमांकावर पोहोचला आहे.

नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान म्हणून देशाची सूत्रे 2014मध्ये हाती घेतली. तेव्हा देशावर 49 लाख कोटी रुपयांचे कर्ज होते. मात्र त्यांचा दुसरा कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत देशावरील कर्जाचा आकडा 205 लाख कोटींवर पोहोचला आहे. याचाच अर्थ गेल्या 10 वर्षांमध्ये देशावरील कर्ज टिप्पट झाले आहे.

दरम्यान, 2004 ते2014 पर्यंत यूपीएचे सरकार सत्तेत होते. मनमोहन सिंग हे देशाचे पंतप्रधान होते. त्यांच्या कार्यकाळामध्ये देशावर कर्जाचा बोझा वाढला नसल्याचे आकडेवारीतून दिसून येते. 2004मध्ये हिंदुस्थानवर 17 लाख कोटी रुपयांचे कर्ज होते. 10 वर्षामध्ये हे कर्ज 55 लाख कोटींपर्यंत गेले. त्यानंतर मोदी सरकार सत्तेत आले. अच्छे दिनचे स्वप्न दाखवत सत्तेत आल्या मोदी सरकारच्या कार्यकाळात कर्जाचा हा आकडा 205 लाख कोटींवर गेला. याचाच अर्थ देशातील प्रत्येक नागरिकाच्या डोक्यावर जवळपास 1.50 लाखांचे कर्ज आहे.

कर्जाच्या खाईत बुडालेले देश

  1. अमेरिका – 34 हजार अब्ज डॉलरचे कर्ज
  2. चीन – 14 हजार अब्ज डॉलरचे कर्ज
  3. जपान – 10 हजार अब्ज डॉलरचे कर्ज
  4. ग्रीस – 3 हजार 999 अब्ज डॉलरचे कर्ज
  5. फ्रान्स – 3 हजार अब्ज डॉलरचे कर्ज
  6. इटली – 2 हजार 800 अब्ज डॉलरचे कर्ज
  7. पोर्तुगाल – 254 लाख कोटींचे कर्ज
  8. हिंदुस्थान – 205 लाख कोटींचे कर्ज
  9. भुतान – 2.39 लाख कोटींचे कर्ज
  10. मोजाम्बिक – 17.21 लाख कोटींचे कर्ज

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

उद्योगविश्व – मंगळवेढ्याची बासुंदी उद्योगविश्व – मंगळवेढ्याची बासुंदी
>>अश्विन बापट मंगळवेढ्याच्या माळी कुटुंबीयांचा बासुंदीचा चार पिढ्यांचा व्यवसाय असून त्यांच्या बासुंदीला मागणी वाढत आहे. भविष्यात बासुंदीमध्ये अंगूर बासुंदी, सीताफळ...
पश्चिमरंग – शूमनचा कार्नवल
सरकारी घर घेऊनही निकम यांनी हॉटेलची बिले उकळली! सचिन सावंत यांनी सादर केली बिले
गुलदस्ता – आवडत्या माणसाला भेटण्याची आस
सृजन संवाद- रामराज्य – रामाच्या कल्पनेतले!
कायदेशार सल्ला – परस्पर संमतीने घटस्फोट महत्त्वाचा
मागोवा – अभिव्यक्तीचे वारे…