माजी आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांना 20 वर्षांची शिक्षा

माजी आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांना 20 वर्षांची शिक्षा

माजी आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांना अंमली पदार्थ पेरून वकिलाला अडकवल्याचा ठपका ठेवून 20 वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. गुजरातच्या बनासकांठा जिल्हायातील पालनपूरच्या सत्र न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.

गुन्हेगारी प्रकरणात संजीव भट दोषसिद्ध असल्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी त्यांना 2019मध्ये जामनगर न्यायालयातही कोठडीतील मृत्यू प्रकरणी दोषाचा ठपका ठेवण्यात आला आहे. बुधवारी अतिरिक्त जिल्हा आि सत्र न्यायाधीश जे. एन. ठक्कर यांनी भट यांना राजस्थानच्या एका वकिलाला खोट्या प्रकरणात अडकवण्यासाठी दोषी मानलं आहे.

संजीव भट्ट यांची सेवा 2015मध्ये समाप्त करण्यात आली होती. त्यावेळी बनासकांठा जिल्ह्यात पोलीस अधीक्षक पदावर कार्यरत होते. जिल्हा पोलिसांनी राजस्थानचे वकील सुमेरसिंह राजपुरोहित यांना अंमली पदार्थ कायद्यातंर्गत अटक केली होती. राजपुरोहित राहत असलेल्या हॉटेलच्या खोलीतून अंमली पदार्थ जप्त केल्याचा दावा पोलिसांनी केला होता. त्यानंतर बनासकांठा पोलिसांनी पाली येथील एका वादग्रस्त संपत्तीच्या स्थानांतरणावरून या प्रकरणात राजपुरोहित यांना अडकवल्याचं उघड झालं होतं.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

महादेव बेटिंग ॲप प्रकरणी अभिनेत्याच्या अडचणीमध्ये वाढ, साहिल खान पोलिस कोठडीत, म्हणाला.. महादेव बेटिंग ॲप प्रकरणी अभिनेत्याच्या अडचणीमध्ये वाढ, साहिल खान पोलिस कोठडीत, म्हणाला..
बाॅलिवूड अभिनेता साहिल खान याच्या अडचणीमध्ये मोठी वाढ झालीये. महादेव बेटिंग ॲप प्रकरण अभिनेत्याच्या चांगलेच अंगलट आल्याचे बघायला मिळत आहे....
थेट मुलाला घेऊन एक्स पतीच्या घरी पोहचली मलायका अरोरा, अरबाज खान..
अभिनेत्रीचा दोनदा घटस्फोट, मुलीनेही सोडली साथ, मोठा खुलासा करत म्हणाली…
लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची – शरद पवार
पोलिसांनी गोमांसासह दोन तस्करांना पकडले, साडेआठ लाखाचा मुद्देमाल जप्त
भागुबाई खिचडिया क्रिकेट स्पर्धा : स्वामी विवेकानंद शाळेला विजेतेपद
मतदानाच्या दिवसापर्यंत तरी उमेदवार जाहीर करा; नाशिकच्या जागेवरून भुजबळांचा महायुतीला टोला