संतापजनक ! कोपरगाव 7 वर्षाच्या मुलीवर विकृताकडून बलात्कार

संतापजनक ! कोपरगाव 7 वर्षाच्या मुलीवर विकृताकडून बलात्कार

अवघ्या सात वर्षांच्या मुलीवर बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना कोपरगाव तालुक्यातील घोयेगाव येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी 50  वर्षाच्या विकृताला पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्याला 30 मार्च पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. विजय निवृत्ती बर्डे (50) रा घोयेगाव, कोपरगाव) असे आरोपीचे नाव आहे. पीडित मुलीच्या आईने कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.

बुधवारी (दि 27) मार्च 24 रोजी पीडित मुलीचे आई-वडील सकाळी 10 वाजता मोलमजुरीच्या कामासाठी जात असतांना पीडित मुलीला भावजय व आजोबा यांच्या घरी सोडून मजुरीच्या कामाला गेले असता दुपारी 12.30 ते 01.00 वाजेच्या सुमारास पीडित मुलीस घराजवळ राहणारा इसम विजय निवृत्ती बर्डे (50)यांने 10 रुपये घे असे म्हणून सदर मुलीस त्याच्या घरात बोलावून घेतले व त्याने त्याच्या घराचा आतून दरवाजा लावून तिच्यासोबत लैंगिक अत्याचार केला. तो लैंगिक अत्याचार करत असतांना पीडित मुलीच्या मामीने सदर पिडित मुलीला आवाज दिला असता त्या नराधमाने त्या मुलीला ओरडू नको असा दम दिला.सदरची घटना मुलीने घरी येऊन आपल्या आईला सांगितली. अधिक चौकशी केली असता बलात्काराचा प्रकार पुढे आला. बुधवारी (दि 27) याप्रकरणी तालुका पोलीसात फिर्याद देण्यात आली. कोपरगाव तालुका पोलिसांनी याप्रकरणी बलात्कार व पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला.

संशयित आरोपीला पोलिसांनी काही तासांतच रात्री उशिरा अटक केली. न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 30 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. पीडित मुलगी जिल्हा शासकीय हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. सदर घटनेची चौकशी शिर्डी विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी शिरिष वमने यांच्या सूचनेनुसार कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन हे अधिक तपास करत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘ती माझ्या बहिणी सारखी…’, कास्टिंग दिग्दर्शक क्रिती सनॉन हिच्याबद्दल असं काय म्हणाला? ‘ती माझ्या बहिणी सारखी…’, कास्टिंग दिग्दर्शक क्रिती सनॉन हिच्याबद्दल असं काय म्हणाला?
बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सनॉन कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. क्रिती हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. गेल्या...
‘सोढी’ बेपत्ता, तारक मेहताच्या भिडेने केला मोठा खुलासा, म्हणाला, दिल्ली ते मुंबई..
प्रसिद्ध अभिनेत्रीचा संशयास्पद परिस्थितीत आढळला मृतदेह, शेवटचं Whatsapp Status पोस्ट करत म्हणाली…
नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची किंमत ठेवली नाही; शरद पवारांचा घणाघात
Sanjay Raut : आम्ही तुमची चांगली तुतारी वाजवणार, संजय राऊतांनी महायुतीवर केला प्रहार
नगर शहरातील कचऱ्याबाबत निलेश लंकेंची थेट मोदींकडे तक्रार, अस्वच्छतेचा वाचवा पाढा
अमित शहा, योगी कोकणात आले तर जनता त्यांना पाणी पाजणार; भास्कर जाधवांचा इशारा