एप्रिल महिन्यात 14 दिवस बँका राहणार बंद; कधी आहेत सुट्ट्या? बघा RBI ची यादी

एप्रिल महिन्यात 14 दिवस बँका राहणार बंद; कधी आहेत सुट्ट्या? बघा RBI ची यादी

एक एप्रिलपासून नव्या आर्थिक वर्षाला सुरुवात होणार आहे. आता रिझर्व्ह बँकेने (RBI) एप्रिल महिन्यात बॅंकांना मिळणाऱ्या सुट्ट्यांची यादी जारी केली आहे. एप्रिल महिन्यात कोणत्या राज्यातील बँकांना, कोणत्या दिवशी सुट्ट्या मिळणार? याची यादी दिली आहे. एप्रिल महिन्यात बँकांना तीन-चार नव्हे तर चौदा दिवसांची सुट्टी मिळणार आहे. वेगवेगळ्या सणांबरोबरच शनिवार-रविवारच्या सुट्ट्यांचाही यामध्ये समावेश आहे.

आरबीआयने राष्ट्रीय स्तरावरील बॅंकाची सुट्ट्यांची यादी त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर जारी केली आहे. त्यामुळे एप्रिलमध्ये बॅंकांसंदर्भातील काही कामे असतील तर त्यासाठी सुट्ट्यांची यादी पाहूनच ग्राहकांना जावे लागेल. एप्रिल महिन्यात कोणत्या दिवशी आणि केव्हा बँक बंद असेल याबाबत जाणून घ्या. सुट्ट्यांची यादी पाहिल्यावर बॅंकेतील कामांचे नियोजन करता येईल.

जाणून घ्या सुट्ट्यांची यादी

7 एप्रिल, 14 एप्रिल, 21 एप्रिल, आणि 28 एप्रिल 2024 रोजी रविवार असल्याने देशभरातील बॅंका बंद असतील.

एप्रिल महिन्यात या दिवशी बॅंका असतील बंद

1 एप्रिल 2024 – अकाऊंट क्लोजिंगमुळे देशभरातील बँका बंद असतील.

5 एप्रिल 2024 – बाबू जगजीवन राम यांच्या जयंती आणि जमात उल विदा निमित्त तेलंगणा, जम्मू आणि श्रीनगरमध्ये बँका बंद राहतील.

9 एप्रिल 2024- गुढी पाडव्यानिमित्त बॅंका बंद असतील. महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळ नाडू, हैदराबाद, आंध्रप्रदेश, मणिपूर, गोवा, जम्मू आणि श्रीनगर.

10 एप्रिल 2024 – रमजान ईद निमित्त कोची आणि केरळ येथेील बॅंका बंद राहतील.

11 एप्रिल 2024 – रमजान ईद निमित्त चंदीगढ, गंगटोक, कोची सोडून देशभरात बॅंका बंद असतील.

13 एप्रिल 2024- महिन्यातील दुसरा शनिवार असल्याने देशभरातील बॅंका बंद असतील.

15 एप्रिल 2024 – बोहाग बिहू आणि हिमाचल दिवसानिमित्त आसाम आणि हिमाचल प्रदेशमधील बँका बंद राहतील.

17 एप्रिल 2024 – रामनवमीनिमित्त मुंबई नागपूरसह चंदीगढ, देहरादून, गंगटोक, हैदराबाद, अहमदाबाद, बेलापूर, भोपाळ, भुवनेश्वर, पाटणा, रांची, शिमला, जयपूर, कानपूर आणि लखनऊ येथील बँका बंद राहतील.

20 एप्रिल 2024 – गरिया पूजा निमित्त त्रिपूरामध्ये बँका बंद राहतील.

27 एप्रिल 2024 – महिन्यातील चौथा शनिवार असल्याने देशभरातील बँका बंद असतील.

बँकांना सुट्ट्या असल्यामुळे ग्राहकांची कुठली गैरसोय होणार नाही. ग्राहक ऑनलाईन, युपीआय, मोबाईल बँकिंग आणि एटीएमच्या माध्यमातून त्यांचे आर्थिक व्यवहार करू शकतात. त्यामुळे सुट्ट्यांचा कोणताही फटका  ग्राहकांना बसणार नाही.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

भोसरीने महाराष्ट्राला दमदार कुस्तीपटू दिले.. भोसरीचा यात्रा उत्सव म्हणजे क्रीडा पर्वणीच : आढळराव पाटील भोसरीने महाराष्ट्राला दमदार कुस्तीपटू दिले.. भोसरीचा यात्रा उत्सव म्हणजे क्रीडा पर्वणीच : आढळराव पाटील
शिरूर लोकसभेतुन अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात असलेले शिवाजी आढळराव पाटील यांनी नुकतीच भोसरी गावच्या यात्रा उत्सवात...
‘सोढी’ बेपत्ता, या कलाकाराने केले मोठे विधान, म्हणाला, त्याच्या कुटुंबियांना..
महादेव बेटिंग ॲप प्रकरणी अभिनेत्याच्या अडचणीमध्ये वाढ, साहिल खान पोलिस कोठडीत, म्हणाला..
थेट मुलाला घेऊन एक्स पतीच्या घरी पोहचली मलायका अरोरा, अरबाज खान..
अभिनेत्रीचा दोनदा घटस्फोट, मुलीनेही सोडली साथ, मोठा खुलासा करत म्हणाली…
लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची – शरद पवार
पोलिसांनी गोमांसासह दोन तस्करांना पकडले, साडेआठ लाखाचा मुद्देमाल जप्त