गुजरातच्या सीमेवर NCB आणि ATS ची मोठी कारवाई; 300 कोटींचे ड्रग्ज जप्त

गुजरातच्या सीमेवर NCB आणि ATS ची मोठी कारवाई; 300 कोटींचे ड्रग्ज जप्त

भारतीय तटरक्षक दलाने गुजरात किनारपट्टीजवळील आंतरराष्ट्रीय सागरी सीमारेषेजवळ एका पाकिस्तानी महिलेला सुमारे 90 किलो ड्रग्जसह अटक केली आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) आणि गुजरात एटीएससोबत झालेल्या संयुक्त ऑपरेशनमध्ये ही मोठी कारवाई करण्यात आलेली आहे. या प्रकरणी टीमने जवळपास 13 जणांना अटक केली आहे. मागील काही दिवसांपासून गुप्त माहितीच्या आधारावर हे एजन्सींचे ऑपरेशन सुरू आहे.

एटीएस आणि एनसीबीने मिळून गुजरात आणि राजस्थानमध्ये अनेक ठिकाणी छापे टाकून मोठी कारवाई केली आहे. ज्यामध्ये एसओजी आणि एनसीबीच्या अधिकाऱ्यांचाही समावेश होता. या प्रकरणी गुजरातचे डीजीपी विकास सहाय यांनी सांगितले की, एटीएसचे डीएसपी एसएल चौधरी यांना दोन महिन्यांपूर्वी अहमदाबादमधील मनोहर लाल आणि गांधीनगरमधील कुलदीप सिंग कच्चा माल घेऊन लॅबमध्ये औषधे तयार करतात अशी माहिती मिळाली होती. यानंतर शनिवारी एटीएससह एनसीबीने मोठी कारवाई केली. ज्यामध्ये 300 कोटी रुपयांचे ड्रग्ज आणि 13 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

एनसीबी आणि एटीएसच्या टीमने इतर अधिकाऱ्यांनसह मिळून 149 किलो मेफेड्रोन पावडर आणि द्रव, 50 किलो इफेड्रिन आणि 200 लिटर एसीटोन जप्त केले आहे. हे ड्रग्ज जालोर जिल्ह्यातील भीनमाल, राजस्थानच्या जोधपूरमधील ओसियन आणि गुजरातच्या गांधीनगर जिल्ह्यातून जप्त केले आहे. यासोबतच अनेक आरोपींना अटक करून चौकशी सुरु आहे.

फेब्रुवारीमध्येही पकडले होते 3,300 किलोचे ड्रग्ज

26 फेब्रुवारी रोजी अरबी समुद्रात एजन्सीद्वारे सगळ्याच मोठे ऑपरेशन केले गेले होते. ज्यामध्ये पोरबंदर किनारपट्टीजवळ 3,300 किलो चरससह पाच पाकिस्तानी नागरिकांना पकडण्यात आले होते. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB), भारतीय नौदल आणि गुजरात दहशतवाद विरोधी पथकाने केलेल्या संयुक्त कारवाईत हिंद महासागरात किनाऱ्यापासून सुमारे 60 नॉटिकल मैल अंतरावर सुमारे 3,300 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

वडील चोरला, वडील चोरला म्हणता… राज ठाकरे यांचा उद्धव ठाकरेंवर हल्ला काय? वडील चोरला, वडील चोरला म्हणता… राज ठाकरे यांचा उद्धव ठाकरेंवर हल्ला काय?
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रत्येक भाषणात एकनाथ शिंदे यांनी माझे वडील चोरले असं म्हणत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या या टीकेचा...
तुम्ही जगा किंवा मरा पण मला पंतप्रधान करा, हीच मोदींची नीती! उद्धव ठाकरे कडाडले
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचे निधन
भाजपाचे अब की बार 400 पार सोडा, देशभरातून 40 जागाही येणार नाहीत – मल्लिकार्जुन खरगे
मजुर नेणारे वाहन उलटले; 27 मजुर जखमी
यापुढे निवडणूक लढवणार नाही; एकनाथ खडसेंची घोषणा, राजकारणातून निवृत्तीचे दिले संकेत
दिल्ली विमानतळ आणि दोन रुग्णालयांना बॉम्बने उडवण्याची धमकी