दिलीप मोहिते पाटलांचे अमोल कोल्हेंना ‘ओपन चॅलेंज’, कोल्हेंनी समोरासमोर बसावं आणि…!

शिरुर लोकसभा निवडणूक रणसंग्राम : मोहिते पाटलांची अमोल कोल्हे यांच्यावर जोरदार टिका

दिलीप मोहिते पाटलांचे अमोल कोल्हेंना ‘ओपन चॅलेंज’, कोल्हेंनी समोरासमोर बसावं आणि…!

गेल्या काही दिवसापासून शिरूरमधील राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांच्यावर अजितदादा गटाकडून जोरदार टिका केली जात आहे. यातच ज्या अमोल कोल्हे यांच्यासाठी मागच्या निवडणुकीत विजयी करण्यासाठी जीव तोडून काम केलं. खिशातून पैसे खर्च करून रात्रीचा प्रचार केला. त्या खासदाराने आम्हाला कधी चहाला सुद्धा बोलवलं नाही. अशी खंत खेड-आळंदीचे आमदार दिलीप मोहिते पाटलांनी व्यक्त केली. यावेळी मोहिते पाटलांनी अमोल कोल्हे यांच्यावर जोरदार टिका देखील केली.

पुणे: गेल्या काही दिवसापासून शिरूरमधील राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांच्यावर अजितदादा गटाकडून जोरदार टिका केली जात आहे. यातच ज्या अमोल कोल्हे यांच्यासाठी मागच्या निवडणुकीत विजयी करण्यासाठी जीव तोडून काम केलं. खिशातून पैसे खर्च करून रात्रीचा प्रचार केला. त्या खासदाराने आम्हाला कधी चहाला सुद्धा बोलवलं नाही. अशी खंत खेड-आळंदीचे आमदार दिलीप मोहिते पाटलांनी व्यक्त केली. यावेळी मोहिते पाटलांनी अमोल कोल्हे यांच्यावर जोरदार टिका देखील केली.

अमोल कोल्हे यांना निवडून आणण्यासाठी आम्ही सगळ्यांनीच मेहनत घेतली. परंतु निवडून आल्यानंतर त्यांनी आम्हाला विचारलं सुद्धा नाही. ज्या गावात आम्ही त्यांच्यासाठी प्रचार केला. त्या गावात ते पाच वर्षात फिरकलेच नाहीत. निधान आभार देखील मानायला त्या गावात जायला पाहिजे होते. परंतु ते देखील त्यांनी केलं नाही. मुळात हा नट आहे आणि नाटकं कसं रंगवायचं हे त्याच्याकडून शिकावं. त्यांना माझं ओपन चॅलेंज आहे की त्यांनी समोरासमोर बसावं आणि पाच वर्षात काय काम केलं ते त्यांनी सांगावं. असेही दिलीप मोहिते पाटील म्हणाले.

आमच्याकडे हुतात्मा राजगुरू यांच्या स्मारकरांचे अनेक बैठका झाल्यात. त्यासाठी त्यांनी किती बैठका घेतल्या ? काय चर्चा केल्या. त्यात त्यांचं किती योगदान आहे. ते त्यांनी सांगावं. आज लोकांना ते खोटं सांगताहेत. भावनिक आव्हान करत आहेत. जर ते खरोखर शेतकऱ्याचे पुत्र असते तर त्यांनी खरी परिस्थिती सांगावी. आजच कांद्याचा प्रश्न निर्माण झाला असल्याचे ते सांगत आहेत. गेल्या पाच वर्षात कांद्याचा प्रश्न निर्माण झाला नाही का ? गेल्या पाच वर्षांमध्ये दुधाचा प्रश्न निर्माण झाला नाही का ? त्यावेळेला काय किती आंदोलन केली ? त्याच्याकरता किती बैठका घेतल्यात ? असा सवाल देखील त्यांनी केला.
 
दरम्यान, मागच्या निवडणुकीत आम्ही २०१४ ला खेड तालुक्यात दीड लाखाचं मताधिक्क दिलं होतं. ते तोडून मागच्या वेळेला आम्ही मोठं मताधिक्क देऊन अमोल कोल्हेंना निवडून दिलं होतं. आता तर आमच्यासोबत राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप आहे. त्यामुळे या मतदारसंघात शिवाजीराव आढळराव पाटलांना मोठं मताधिक्क मिळणार असा दावा देखील त्यांनी व्यक्त केला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मी नशिबवान की बाबा माझ्या लहानपणीच गेले, कारण..; सखी गोखले असं का म्हणाली? मी नशिबवान की बाबा माझ्या लहानपणीच गेले, कारण..; सखी गोखले असं का म्हणाली?
अभिनेत्री सखी गोखले हिने तिचे बाबा दिवंगत अभिनेते मोहन गोखले यांच्या निधनावर एका मुलाखतीत भाष्य केलं आहे. बाबा लवकर गेल्याने...
Lok Sabha Elections 2024 : तर तुम्हाला ओपिनियन देण्याचा अधिकार नाही; सलील कुलकर्णी यांनी फटकारलं
कंगना रनौत हिच्या को-स्टारची घरात घुसून का केली हत्या? मर्डरनंतर आरोपींनी केलं असं काम
‘तारक मेहता..’मधील सोनू भिडेनं गुडघ्यावर बसून बॉयफ्रेंडला केलं प्रपोज, पहा फोटो
IPL 2024 : भर स्टेडियममध्ये अनुष्काने जोडले हात… विराट ठरला कारणीभूत ! काय झालं असं ?
Lok Sabha Elections 2024 : पुण्यात गोंधळ, आंदोलन अन् प्रशासनावर संताप, लोकसभा मतदानातील घडामोडींची A to Z माहिती
बारामतीच्या ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँग रुमचे सीसीटीव्ही फूटेज बंद पडणे ही गंभीर घटना; सुप्रिया सुळेंकडून संताप व्यक्त