‘ती माझ्या बहिणी सारखी…’, कास्टिंग दिग्दर्शक क्रिती सनॉन हिच्याबद्दल असं काय म्हणाला?

‘ती माझ्या बहिणी सारखी…’, कास्टिंग दिग्दर्शक क्रिती सनॉन हिच्याबद्दल असं काय म्हणाला?

बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सनॉन कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. क्रिती हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. गेल्या 10 वर्षांपासून अभिनेत्र इंडस्ट्रीमध्ये सक्रिय आहे. क्रिती फक्त तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळेच नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. सांगायचं झालं तर, क्रिती हिचं नाव दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्यासोबत देखील जोडण्यात आलं. पण पुढे त्यांच्या रिलेशनशिपबद्दल काहीही कळलं नाही. आता अभिनेत्री सिंगल असल्याची माहिती मिळत आहे. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत कास्टिंग दिग्दर्शक मुकेश छाब्रा यांनी देखील क्रिती हिच्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.

माझ्या एका चुकीमुळे क्रिती हिच्यासोबत असलेल्या नात्यात दुरावा निर्माण झाला होता... असं देखील दिग्दर्शक मुकेश छाब्रा म्हणाले. शिवाय झालेली चूक सुधारण्यासाठी दिग्दर्शक मुकेश छाब्रा यांना अनेक गोष्टी कराव्या लागल्या… सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त क्रिती आणि मुकेश यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे.

आयुष्यात झालेल्या कोणत्या गोष्टीचा अधिक पश्चाताप होत आहे. यावर क्रिती हिचं नाव घेत मुकेश म्हणाले, ‘क्रिती माझ्या बहिणीसारखी आहे. माझ्या सख्या बहिणीपेक्षा देखील मी जास्त तिच्यावर प्रेम करतो. पण एकदा मी तिच्यासोबत खोटं बोललो होतो…’

‘जेव्हा त्या खोट्या गोष्टीबद्दल क्रिती हिला माहिती झालं तेव्हा वादग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती. अशात आमचं नातं पुन्हा पुर्वी सारखं होण्यासाठी अनेक वर्ष लागले…’ असं देखली मुकेश म्हणाले. सध्या सर्वत्र मुकेश यांच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.
मुकेश छाब्रा यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, त्यांनी अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्यासोबत ‘दिल बेचारा’ सिनेमात कान केलं होतं. ‘दिल बेचारा’ हा सिनेमा सुशांत याचा अखेरचा सिनेमा ठारला. अभिनेत्याच्या निधनानंतर सिनेमा प्रदर्शित करण्यात आला होता. तर मुकेश छाब्रा यांनी अनेक सिनेमांमध्ये कास्टिंग दिग्दर्शक म्हणून काम केलं आहे.

क्रिती सनॉन हिच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, नुकताच क्रिती अभिनेत्री करीना कपूर आणि तब्बू यांच्यासोबत ‘क्रू’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस आली. आता अभिनेत्री ‘दो पत्ती’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमात क्रिती हिच्यासोबत अभिनेत्री काजोल देखील असणार आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मॅड कॉमेडी आणि धावपळीची धमाल…; ‘ये रे ये रे पैसा’ पुन्हा बॉक्स ऑफिसवर मॅड कॉमेडी आणि धावपळीची धमाल…; ‘ये रे ये रे पैसा’ पुन्हा बॉक्स ऑफिसवर
संजय जाधव दिग्दर्शित ‘ये रे ये रे पैसा’ या सिनेमाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. मॅड कॉमेडी असलेला ‘ये रे ये...
तेलुगु आणि कन्नड अभिनेत्रीचे अपघाती निधन
पाकव्याप्त काश्मीरमध्ये युद्धजन्य परिस्थिती; महागाईविरोधात नागरिक रस्त्यावर
मार्की येथे वीज पडून बैल जोडी ठार , शेतकऱ्यावर ओढवले संकट
भाजप नेत्यांनी संदेशखळीतील महिलांना आंदोलन करण्यासाठी पैसे दिले, व्हायरल व्हिडीओतून दावा
माझीच चूक होती, माझ्यामुळे..; मुलीच्या पहिल्या घटस्फोटाविषयी असं का म्हणाल्या नीना गुप्ता?
प्रायव्हेट व्हिडीओ लीकप्रकरणी चर्चेत आलेली ज्योती राय आहे तरी कोण? काही दिवसांपूर्वी मिळालेली धमकी