‘सोढी’च्या शेवटच्या लोकेशनबद्दल मोठा खुलासा, एटीएममधून काढले इतके पैसे आणि त्यानंतर गुरुचरण सिंग गायब, वाढले गूढ

‘सोढी’च्या शेवटच्या लोकेशनबद्दल मोठा खुलासा, एटीएममधून काढले इतके पैसे आणि त्यानंतर गुरुचरण सिंग गायब, वाढले गूढ

तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेत रोशन सिंग सोढीची भूमिका साकारणारा अभिनेता गुरूचरण सिंग हा गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता आहे. आता पोलिसांनी या प्रकरणात तपास देखील सुरू केला आहे. हैराण करणारे म्हणजे 22 एप्रिलपासून गुरूचरण सिंग हा बेपत्ता आहे. 22 एप्रिलला दिल्लीवरून गुरूचरण सिंगचे मुंबईसाठीचे सकाळी आठचे फ्लाईट होते. मात्र, हैराण करणारे म्हणजे गुरूचरण सिंग हा विमानतळावर पोहचलाच नाही. तो 24 एप्रिलपर्यंत दिल्लीच होता. आता या प्रकरणात तपास करत असलेल्या पोलिसांच्या हाती काही महत्वाची माहिती ही लागली आहे. जाण्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसलाय.

गुरूचरण सिंग हा दिल्लीच्या पालम परिसरातील काही सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसला आहे. यावेळी रस्त्याच्याकडेने तो एकटाच चालताना दिसतोय. हेच नाही तर यावेळी त्याच्या पाठीवर एक बॅग देखील दिसत आहे. हैराण करणारे म्हणजे गुरूचरण सिंगचे शेवटचे लोकेशन हे त्याच्या घराच्या अवघ्या दोन ते तीन किलो मीटरवर दिसत आहे, त्यानंतर तो बेपत्ता झाला.

गुरूचरण सिंगने दिल्लीच्या एका एटीएमवरून सात हजार रूपये काढल्याचे देखील पोलिस तपासात उघड झालंय. पोलिसांच्या हाती लागलेल्या कागदपत्रांनुसार गुरूचरण सिंग हा गेल्या काही दिवसांपासून आर्थिक संकटात होता. हेच नाही त्याचे लग्न देखील काही दिवसांवर होते आणि दुसरीकडे तो रूग्णालयात उपचार घेऊन घरी आराम करत होता.

हे तर स्पष्ट आहे की, गुरूचरण सिंग हा मुंबईकडे न जाता दिल्लीमध्येच होता. दिल्लीच्या पालम परिसरातील अनेक सीसीटीव्हीमध्ये तो दिसत आहे. गुरूचरण सिंगचे अपहरण केल्याचा अंदाज लावला जातोय. अजूनही पोलिस या प्रकरणात तपास करताना दिसत आहेत. गुरूचरण सिंग याने 2020 मध्ये तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका सोडली होती.

गुरूचरण सिंगची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. गुरूचरण सिंग सोशल मीडियावर सक्रिय असून आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना कायमच दिसतो. आजही लोक गुरूचरण सिंगला सोढी याच नावाने ओळखतात. गुरूचरण सिंगसाठी त्याचे चाहते हे प्रार्थना करताना दिसत आहेत. गुरूचरण सिंगच्या प्रत्येक अपडेटकडे चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचे निधन ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचे निधन
मराठी मालिकाविश्वातून लोकप्रिय झालेले ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन झालं आहे. रंगभूमीवरच त्यांनी आपला अखेरचा श्वास घेतला. सृजन द...
भाजपाचे अब की बार 400 पार सोडा, देशभरातून 40 जागाही येणार नाहीत – मल्लिकार्जुन खरगे
मजुर नेणारे वाहन उलटले; 27 मजुर जखमी
यापुढे निवडणूक लढवणार नाही; एकनाथ खडसेंची घोषणा, राजकारणातून निवृत्तीचे दिले संकेत
दिल्ली विमानतळ आणि दोन रुग्णालयांना बॉम्बने उडवण्याची धमकी
मॅड कॉमेडी आणि धावपळीची धमाल…; ‘ये रे ये रे पैसा’ पुन्हा बॉक्स ऑफिसवर
तेलुगु आणि कन्नड अभिनेत्रीचे अपघाती निधन