नरेंद्र मोदींच्या अंगात औरंगजेब संचारल्याने ते महाराष्ट्रावर चाल करून येत आहेत; संजय राऊत यांचा हल्लाबोल

नरेंद्र मोदींच्या अंगात औरंगजेब संचारल्याने ते महाराष्ट्रावर चाल करून येत आहेत; संजय राऊत यांचा हल्लाबोल

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांची पुण्यात सभा झाली. यावेळी बारामतीची लढाई ही फक्त शरद पवार किंवा सुप्रिया सुळे यांची नसून महाराष्ट्राच्या अस्मितेची लढाई आहे, असे त्यांनी सांगितले. ही ऐतिहासिक निवडणूक असून आपल्याला लोकशाही हवी की हुकूमशाही हवी, याचा निर्णय़ जनतेने करायचा आहे, असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी अजित पवार, मिंधे आणि भाजपचा चांगलाच समाचार घेतला.

शरद पवार यांनी एक पक्ष काढला त्याचा विस्तार केला आणि तो पक्ष वाढवण्यासाठी यांच्या हातात दिला आणि यांनी काय केले, असा सवाल संजय राऊत यांनी केला. आज आचार्य अत्रए असते तर म्हणाले असते असा हरामखोर 10 हजार वर्षात झाला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगत आहे की, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी श्री रामाचा अपमान केला. राम मंदिराच्या उद्घाटनाला शरद पवार आणि शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित नव्हते. म्हणून रामाचा अपमान झाला, असे ते म्हणातात. त्यांना या क्रायक्रमाचा व्हिडीओ दाखवा, बोला रामकृष्ण हरी, वाजवा तुतारी, असे रामकृष्ण म्हणणारे रामाचा अपमान कसा करतील, असेही ते म्हणाले.

बारामतीची लढाई ही शरद पवार किंवा सुप्रिया सुळे यांची नाही, बारामतीची लढाई ही महाराष्ट्राच्या अस्मितेची लढाई आहे. भाजपचे काही नेते शरद पवार यांना संपवण्यासाठी बारामतीत येत आहेत. आले किती गेले किती संपले भरारा, तरीही शरद पवार यांचा आजही दरारा, ते काय आम्हाला संपवणार, काँग्रेसमुक्त भारत करणार होते. मात्र, आज काँग्रेसयुक्त भाजप झाला आहे. या देशात हुकूमशाही राहील की लोकशाही राहील हे ठरणार आहे. त्यामुळे ही लढाई महत्त्वाची आहे. अजित पवार जाहीरपणे धमक्या देतात,माझे काम कर नाही तर बघून घेणार, असे ते म्हणत आहेत. ते काय बघणार, आता जनताच त्यांना 4 जूनननंतर बघून घेणार आहे. कोणाच्याही धमक्यांना महाराष्ट्रातील जनता घाबरणार नाही. हिंमत असेल तर धमक्या न देता निवडणूक लढून दाखवा, असे आव्हानही त्यांनी दिले. शरद पवार हे राज्यातील आणि देशातील शक्तीशाली नेते आहेत, हे महाराष्ट्र दाखवून देईल, असेही संजय राऊत म्हणाले.

नरेंद्र मोदी आणि अमित शहा देशाची चिंता सोडून महाराष्ट्रात येत आहेत. त्यांना आता महाराष्ट्राची भीती वाटत आहे. हा महाराष्ट्र देशाची सत्ता उलथवून लावेल, अशी भीती त्यांना आहे. ते 10 वर्षांपासून सातत्याने खोटे बोलत आहे. फक्त महाराष्ट्र गिळायचा, मराठी माणसाच्या स्वाभिमानाला धक्का लावायचा, मुंबई लुटायची आणि सर्व लूट गुजरातला न्यायची ,असे मोदी शहा यांचे धोरण आहे. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराष्ट्राचा जन्म झाला, त्यामुळे महाराष्ट्राला इतिहास आहे. औरंगाजेबाचा जन्म गुजरातला झाला, त्यामुळे मोदी यांच्या अंगात औरंगजेब संचारला आहे. त्यामुळे ते औरंगजेबासारखी महाराष्ट्रावर चाल करून येत आहे. ज्या माणसाने घरातील मंगळसूत्राची प्रतिष्ठा ठेवली नाही, त्यांनी मगंळसूत्राची उठाठेव करू नये. देशात गेल्या 10 वर्षात महिलांचे मंगळसूत्र अडचणीत आले आहे. नोटाबंदी, लॉकडाऊन यामुळे अनेक महिलांनी मंगळसूत्र विकून चुली पेटवल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.

खोटे बोलणार पंतप्रधान देशाला लाभला हे देशाचे आणि लोकशाहीचे दुर्दैव आहे. लोकशाही रक्षणासाठी महाराष्ट्रातून सुरूवात होण्याची गरज आहे. मोदी महाराष्ट्रात येतात आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढणारी शिवसेना फोडतात. राष्ट्रवादी फोडतात. मात्र, त्याने काहीही फरक पडत नाही. शिंदे- अजित पवार हे फडणवीस गट आहेत. पक्षाचा संस्थापक समोर बसलेला असताना पक्ष कोणाचा असा प्रश्न निवडणूक आयोगाला पडला आहे. पुण्यात कोयता गँग आहे. त्याचा प्रमुख बारामतीत आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

भाजपला विकास जन्माला घालता आला नाही, म्हणून आधी ठाण्याचा नवरा केला, नंतर नांदेडचा नवरा केला आता बारामतीचाही नवरा केला, तीनतीन नवरे करूनही त्यांना विकास जन्माला घालता आला नाही, असा हल्लाबोलही संजय राऊत यांनी केला. मोदी यांची सत्ता आता 4 जूननंतर राहणार नाही. आपल्याकडे सत्ता आल्यावर बंद पडलेल्या फाईल पुन्हा टेबलवर येणार आहे. इतिहास हा लढवय्यांचा लिहिला जातो. पळपुट्यांचा इतिहास लिहिला जात नाही, असेही संजय राऊत यांनी ठणकावले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

ज्या शिवसेनेसोबत 25 वर्षे सत्ता भोगली ती शिवसेना नकली ? मोदी-शाहांवर उद्धव ठाकरेंची कडाडून टीका ज्या शिवसेनेसोबत 25 वर्षे सत्ता भोगली ती शिवसेना नकली ? मोदी-शाहांवर उद्धव ठाकरेंची कडाडून टीका
लोकसभा निवडणुकीचा रणसंग्रामात आज देशभरात चौथ्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. महाराष्ट्रातहा 11 मतदारसंघात आज मतदान होत आहे. मागच्या तीन टप्प्यांप्रमाणे...
घटस्फोटानंतर अभिनेत्रीचं दुसरं लग्न, सावत्र मुलगीच नाहीतर, स्वतःचा मुलगाही नाही म्हणत आई, कारण…
मनला चटका लावणारा शेवट, स्टेजवर परफॉर्म करताना प्रसिद्ध अभिनेत्याने घेतला अखेरचा श्वास
भर रस्त्यावर करीना कपूर-सैफ अली खानचा लिप लॉक; व्हिडीओवर भडकले नेटकरी
मी प्रिती झिंटाच्या बॉयफ्रेंडला..; ‘दिल चाहता है’ फेम अभिनेत्रीचं बऱ्याच वर्षांनंतर स्पष्टीकरण
Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांसोबत आलेल्या पोलिसांच्या हातामध्ये त्या जड बॅगा कसल्या? ठाकरे गटाचा सवाल, VIDEO
Amol Kolhe : अजितदादा म्हणालेत यावेळी पाडणार, मतदानाच्या दिवशी अमोल कोल्हे म्हणाले…