मोदींवरील टीका भोवली; भाजपच्या अल्पसंख्याक विभागाच्या माजी प्रमुखाला बेड्या

मोदींवरील टीका भोवली; भाजपच्या अल्पसंख्याक विभागाच्या माजी प्रमुखाला बेड्या

भाजप नेता आणि बिकानेर अल्पसंख्यांक विभागाचा माजी अध्यक्ष उस्मान गनी याला पोलिसांनी अटक केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमध्ये मुस्लिम समाजाबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावर टीका केल्यानंतर त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

‘काँग्रेस सत्तेवर आली तर हिंदूंची संपत्ती ते जास्त मुले असलेल्यांना (मुस्लिमांना) वाटतील. तुमची मंगळसूत्रेही खेचली जातील’, असे विधान पंतप्रधान मोदींनी राजस्थानमधील बन्सवाडा येथील सभेमध्ये केले होते. यानंतर मोदींवर चौफेर टीका होऊ लागली. भाजप नेता आणि बिकानेर अल्पसंख्यांक विभागाचा अध्यक्ष उस्मान गनी यानेही त्यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर त्याला पक्षातून निलंबित करण्यात आले आणि शनिवारी शांतता भंग केल्याचा आरोप करत पोलिसांनी त्याला बेड्याही ठोकल्या.

याबाबत माहिती देताना बिकानेरच्या मुक्ता प्रसाद पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धीरेंद्र शेखावत म्हणाले की, पंतप्रधानावर केलेल्या विधानानंतर खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांचे वाहन त्याच्या घरी पाठवण्यात आले होते. मात्र तो दिल्लीत होती. दिल्लीहून आल्यानंतर तो पोलीस ठाण्यात पोहोचला आणि माझ्या घरी वाहन कसे पाठवले म्हणून हुज्जत घालू लागला. तो कोण आहे हे देखील आम्हाला माहिती नव्हते. पोलीस स्थानकासमोर नाकाबंदी करण्यात आली होती आणि तिथे येऊन त्याने बाचाबाची केल्याने आम्ही त्याला अटक केली.

उस्मान गनी याच्यावर कलम 151 नुसार गुन्हा दाखल केला असून सध्या तो तुरुंगात आहे. त्याला अतिरिक्त न्यायदंडाधिकाऱ्यांपुढे उभे केले जाणार आहे. त्याला किमान 6 महिन्यांची शिक्षा व्हावी असा आमचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. मात्र यादरम्यान त्याच्या घरी पोलिसांचे वाहन नक्की का पाठवण्यात आले होते याचा खुलासा पोलिसांनी केलेला नाही.

काय म्हणाला उस्मान गनी?

मोदींच्या विधानानंतर एका वृत्तवाहिनीशी बोलताना उस्मान गनी याने त्यांचा निषेध केला होता. एक मुस्लिम व्यक्ती म्हणून मला पंतप्रधान मोदींच्या विधानाचा खेद वाटतो. भाजपच्या प्रचारासाठी जातो तेव्हा मला लोकं मोदींच्या विधानाबाबत जाब विचारतात, असे तो म्हणाला होता. ‘इंडियन एक्सप्रेस‘ने याबाबत वृत्त दिले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

ज्या शिवसेनेसोबत 25 वर्षे सत्ता भोगली ती शिवसेना नकली ? मोदी-शाहांवर उद्धव ठाकरेंची कडाडून टीका ज्या शिवसेनेसोबत 25 वर्षे सत्ता भोगली ती शिवसेना नकली ? मोदी-शाहांवर उद्धव ठाकरेंची कडाडून टीका
लोकसभा निवडणुकीचा रणसंग्रामात आज देशभरात चौथ्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. महाराष्ट्रातहा 11 मतदारसंघात आज मतदान होत आहे. मागच्या तीन टप्प्यांप्रमाणे...
घटस्फोटानंतर अभिनेत्रीचं दुसरं लग्न, सावत्र मुलगीच नाहीतर, स्वतःचा मुलगाही नाही म्हणत आई, कारण…
मनला चटका लावणारा शेवट, स्टेजवर परफॉर्म करताना प्रसिद्ध अभिनेत्याने घेतला अखेरचा श्वास
भर रस्त्यावर करीना कपूर-सैफ अली खानचा लिप लॉक; व्हिडीओवर भडकले नेटकरी
मी प्रिती झिंटाच्या बॉयफ्रेंडला..; ‘दिल चाहता है’ फेम अभिनेत्रीचं बऱ्याच वर्षांनंतर स्पष्टीकरण
Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांसोबत आलेल्या पोलिसांच्या हातामध्ये त्या जड बॅगा कसल्या? ठाकरे गटाचा सवाल, VIDEO
Amol Kolhe : अजितदादा म्हणालेत यावेळी पाडणार, मतदानाच्या दिवशी अमोल कोल्हे म्हणाले…