नगरमध्ये भाजपची ‘डमी’ खेळी; मतविभाजनासाठी उभा केला अपक्ष नीलेश लंके

नगरमध्ये भाजपची ‘डमी’ खेळी; मतविभाजनासाठी उभा केला अपक्ष नीलेश लंके

बारामतीमधून शरद पवार आणि रायगडमधून अनंत गीते यांच्या नावाचे अपक्ष उमेदवार लोकसभेच्या रिंगणात उतरले असताना आता नगरमध्ये नीलेश लंके नावाच्या अपक्ष उमेदवाराने अर्ज भरला आहे. भाजपने मत विभाजनासाठी हा डमी उमेदवार उभा केल्याचे म्हटले जात आहे.

नगर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे सुजय विखे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार नीलेश लंके यांच्यात थेट लढत आहे. मात्र, आता आणखी एका नीलेश लंके याने निवडणूक रिंगणात प्रवेश करून अपक्ष म्हणून अर्ज भरला आहे. नीलेश लंके यांना मतदान करणाऱया मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी भाजपने ही रणनीती आखल्याचे म्हटले जात आहे.

 माझ्या नाकाचा साम्य असलेला उमेदकार तुमच्या माध्यमातून अर्ज दाखल करतो अगदी तुमच्या आतापर्यंतच्या पन्नास कर्षाच्या डमी कारभारासारखाच.. परीक्षेला नापास होणाऱया एखाद्या किद्यार्थ्याला परीक्षेची भीती काटते आणि डमी किद्यार्थी पुढे कराका लागतो, पैशाच्या बळाकर उमेदकार डमी उभा कराल ही.. पण मतदान रुपी जनता डमी तयार करता येत नाही एकढं लक्षात ठेका. असे राष्ट्रवादीचे उमेदवार निलेश लंके यांनी म्हटले आहे.

 

डमीचे राजकारण ही विखेंची परंपरा

 महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश ज्ञानदेव लंके यांच्या नावाशी साधर्म्य असलेल्या व्यक्तीने अर्ज भरला आहे. हा उमेदवार सुजय विखे यांनीच उभा केल्याचा आरोप महाविकास आघाडीने केला आहे. डमीचे राजकारण करण्याची विखे यांची परंपरा आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी केली.

 

 

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचे निधन ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचे निधन
मराठी मालिकाविश्वातून लोकप्रिय झालेले ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन झालं आहे. रंगभूमीवरच त्यांनी आपला अखेरचा श्वास घेतला. सृजन द...
भाजपाचे अब की बार 400 पार सोडा, देशभरातून 40 जागाही येणार नाहीत – मल्लिकार्जुन खरगे
मजुर नेणारे वाहन उलटले; 27 मजुर जखमी
यापुढे निवडणूक लढवणार नाही; एकनाथ खडसेंची घोषणा, राजकारणातून निवृत्तीचे दिले संकेत
दिल्ली विमानतळ आणि दोन रुग्णालयांना बॉम्बने उडवण्याची धमकी
मॅड कॉमेडी आणि धावपळीची धमाल…; ‘ये रे ये रे पैसा’ पुन्हा बॉक्स ऑफिसवर
तेलुगु आणि कन्नड अभिनेत्रीचे अपघाती निधन