सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपींविरोधात मोक्का; चौघांना अटक, गँगस्टर बिष्णोई भाऊ वॉण्टेड

सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपींविरोधात मोक्का; चौघांना अटक, गँगस्टर बिष्णोई भाऊ वॉण्टेड

अभिनेता सलमान खान याच्या वांद्रे येथील घरावर बेछूट गोळीबार केल्या प्रकरणातील आरोपींविरोधात मुंबई पोलिसांनी कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. पोलिसांनी आरोपींवर मोक्का लावला आहे. गोळीबार प्रकरणात गुन्हे शाखेने चार जणांना अटक केली असून गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई आणि त्याचा भाऊ तसेच या गुह्याचा मास्टरमाइंड अनमोल बिष्णोई हे दोघे वॉण्टेड आरोपी आहेत.

14 एप्रिलच्या पहाटे सलमान खानच्या घरावर गोळीबार झाला होता.  सागर पाल आणि विकी गुप्ता या दोघा बिहारच्या तरुणांनी हे कांड केले होते. पंजाबमध्ये गोळीबार करण्याचा कट शिजल्यानंतर सागर आणि विक्की हे आरोपी 28 फेब्रुवारीला मुंबईत आले होते. त्यांनी 10 मार्च रोजी पनवेलमध्ये एक घर भाडय़ाने घेतले. काही दिवस तेथे राहिल्यानंतर ते होळीनिमित्त गावी गेले. गावावरून परतल्यानंतर त्यांनी प्रत्यक्षात गुन्हा केला होता. या गोळीबार प्रकरणात गुन्हे शाखेने सागर, विक्की यांना पकडल्यानंतर या दोघांना पिस्तूल आणून देणारे व कटात सहभागी असलेले सोनू बिष्णोई आणि अनुजकुमार थापन या दोघांची नावे पुढे आली. त्यानुसार पोलिसांनी दोघांना पंजाबमधून पकडून आणले. चार जणांना बेडय़ा ठोकल्यानंतर पोलिसांनी आरोपींविरोधात ‘मोक्का’न्वये कारवाई केली. पोलीस आता या गुह्याचा मास्टरमाइंड गँगस्टर अनमोल बिष्णोई याचा शोध घेत आहेत. अनमोलविरोधात लूक आऊट नोटीसदेखील जारी केली आहे.

थापनविरोधात दोन गुन्हे; सात पिस्तुले हस्तगत केली होती

दरम्यान, हा गोळीबार करण्यासाठी या दोघांना पिस्तूल आणून देणारे सोनू बिष्णोई आणि अनुजकुमार थापन या दोघांना गुन्हे शाखेने पंजाबमधून पकडून आणले. दोघांपैकी थापनविरोधात पंजाबमध्ये दोन गुह्यांची नोंद आहे. त्यात एक गोळीबार केल्याचा गुन्हा आहे. तर पंजाबच्या गंगानगर पोलिसांनी थापनकडून सात पिस्तुले हस्तगत केली होती, असे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात येते.

होळीकरिता गावी जाऊन गोळीबाराचा सराव

पनवेल येथे भाडय़ाने घेतलेल्या खोलीत काही दिवस राहून सागर आणि विक्की होळीकरिता पुन्हा गावी गेले होते. त्यावेळी दोघांनी गावी गोळीबार करण्याचा सराव केला होता. त्यासाठी दोघांनी प्रत्येकी चार अशा प्रकारे आठ गोळय़ांचा वापर केला. तेथून परतल्यानंतर त्यांनी सलमानच्या घरावर गोळीबार केला असे पोलीस सूत्रांकडून समजते.  हा गोळीबार करण्यासाठी त्यांना सोनू आणि अनुज यांनी पिस्तूल आणि काडतुसे आणून दिली होती.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मी नशिबवान की बाबा माझ्या लहानपणीच गेले, कारण..; सखी गोखले असं का म्हणाली? मी नशिबवान की बाबा माझ्या लहानपणीच गेले, कारण..; सखी गोखले असं का म्हणाली?
अभिनेत्री सखी गोखले हिने तिचे बाबा दिवंगत अभिनेते मोहन गोखले यांच्या निधनावर एका मुलाखतीत भाष्य केलं आहे. बाबा लवकर गेल्याने...
Lok Sabha Elections 2024 : तर तुम्हाला ओपिनियन देण्याचा अधिकार नाही; सलील कुलकर्णी यांनी फटकारलं
कंगना रनौत हिच्या को-स्टारची घरात घुसून का केली हत्या? मर्डरनंतर आरोपींनी केलं असं काम
‘तारक मेहता..’मधील सोनू भिडेनं गुडघ्यावर बसून बॉयफ्रेंडला केलं प्रपोज, पहा फोटो
IPL 2024 : भर स्टेडियममध्ये अनुष्काने जोडले हात… विराट ठरला कारणीभूत ! काय झालं असं ?
Lok Sabha Elections 2024 : पुण्यात गोंधळ, आंदोलन अन् प्रशासनावर संताप, लोकसभा मतदानातील घडामोडींची A to Z माहिती
बारामतीच्या ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँग रुमचे सीसीटीव्ही फूटेज बंद पडणे ही गंभीर घटना; सुप्रिया सुळेंकडून संताप व्यक्त