एव्हरेस्ट आणि एमडीएचच्या मसाल्यांबाबत आता अमेरिकाही सतर्क; मसाल्यांची तपासणी करण्याचा निर्णय

एव्हरेस्ट आणि एमडीएचच्या मसाल्यांबाबत आता अमेरिकाही सतर्क; मसाल्यांची तपासणी करण्याचा निर्णय

हाँगकाँग आणि सिंगापूरने हिंदुस्थानातील दोन लोकप्रिय मसाला ब्रँड एव्हरेस्ट आणि MDH च्या काही उत्पादनांवर बंदी घातली. तसेच त्याच्या विक्रीवरही बंदी घालण्यात आली. यामुळे हिंदुस्थानातील एव्हरेस्ट मसाला वापरणाऱ्या ग्राहकांना मोठा धक्का बसला. या मसाल्यात इथिलीन ऑक्साईड नावाचे कीटकनाशक आढळून आल्याने आता अमेरिकेतही या दोन ब्रँडची चौकशी सुरू झाली आहे. अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) देखील या मसाल्यांमध्ये कर्करोगास कारणीभूत असलेल्या कीटकनाशकाचा तपास सुरू केला आहे.

यूएस फूड सेफ्टी डिपार्टमेंट (USFDA) ने हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये मसाल्यांवर बंदी घातल्यानंतर MDH आणि एव्हरेस्टच्या उत्पादनांची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, एफडीए या दोन ब्रँडच्या उत्पादनांवर बंदी घालण्याबाबत सतर्क आहे. त्यामुळ याबाबत आणखी काही माहिती मिळते का यासाठी प्रय़त्न केले जात आहेत. या समस्येबाबत बोर्डाने मसाला उद्योगाकडून सविस्तर माहितीही मागवली आहे. अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता सुनिश्चित करणे ही त्यांची पहिली प्राथमिकता असल्याचे बोर्डाने म्हटले आहे. हिंदुस्थानसोबतच युरोप, आशिया आणि उत्तर अमेरिकेत एमडीएच आणि एव्हरेस्टच्या मसाल्यांना चांगली मागणी आहे. एमडीएच आणि एव्हरेस्टने याबाबत तात्काळ कोणतेही वक्तव्य दिलेले नाही.

हाँगकाँगने MDH च्या मद्रास करी पावडर, सांभर मसाला मिक्स पावडर आणि करी पावडर मिश्रित मसाला यावर बंदी घातली आहे. तर सिंगापूरने आपल्या नागरिकांना एव्हरेस्टची फिश करी मसाला पावडर वापरण्यापासून रोखले आहे. तो बाजारातून मागे घेण्याचे आदेशही कंपनीला देण्यात आले आहेत. कारण हाँगकाँग आणि सिंगापूरच्या अन्न सुरक्षा विभागाच्या म्हणण्यानुसार इथिलीन ऑक्साईड या रसायनाचा दीर्घकाळ वापर केल्याने कर्करोग होऊ शकतो.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

सर्वात मोठी बातमी, अवकाळीचा मुंबईकरांना तडाखा, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, प्रवाशांचा खोळंबा सर्वात मोठी बातमी, अवकाळीचा मुंबईकरांना तडाखा, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, प्रवाशांचा खोळंबा
मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघरमध्ये अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची मोठी तारांबळ उडवून दिली आहे. अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांना अनेक...
Mumbai and Thane Rain | मुंबई, ठाणे, नवी मुंबईत मेघगर्जनेसह पाऊस, उकाड्याने हैराण नागरिकांना मोठा दिलासा
जिद्दीला सलाम… फक्त पाणी पिऊन जिवंत, लास्ट स्टेजवर असतानाही मतदान; कोण आहे ही महिला?
मुंबईत वादळी पावसाचा धुमाकूळ; रेल्वे वाहतूकीचा खोळंबा, रस्ते वाहतूक संथ गतीनं
घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळलं; अनेक जण अडकल्याची भीती, 7 ते 8 जण जखमी
भाजपला बहुमत मिळणार नाही, राजकीय विश्लेषकाची पोस्ट व्हायरल
भाजपच्या उमेदवारानं मुस्लिम महिलांना ओळखपत्र मागितलं; तपासणीसाठी बुरखा हटवण्यास सांगितल्यावरून वाद