सरकारने सरसकट कांदा निर्यातबंदी उठवायला पाहिजे होती, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा सरकारवर हल्लाबोल

सरकारने सरसकट कांदा निर्यातबंदी उठवायला पाहिजे होती, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा सरकारवर हल्लाबोल

फक्त गुजरातच्याच कांद्याला निर्यातीची परवानगी देण्याचा निर्णय बॅकफायर होताच आज घाईगडबडीने केंद्र सरकारने 99,150 मॅट्रिक टन कांद्यावरील निर्यातबंदी उठवली. हे प्रमाण फार कमी आहे, सरकारने सरसकट कांदा निर्यातबंदी उठवायला पाहिजे होती. सरकारची घोषणा म्हणजे दर्यात खसखस असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारला जोरदार टोला लगावला.

आपल्या ट्विटर हँडलवरून त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. पुढे ते म्हणाले की, खरंतर ही बंदी सहा महिन्यांआधीच उठवायला पाहिजे होती पण आधी सरकारने मोठ्या व्यापाऱ्यांचा विचार केला, नंतर गुजरातचा विचार केला आणि शेवटी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा विचार केला आहे का अशी शंका येते.

नाशिक, नगर, पुणे या भागातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे 400 पारची घोषणा करणाऱ्यांना 150 तरी मिळतील का अशी भीती वाटत आहे म्हणून हा निर्णय घेतला असावा, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

उद्योगविश्व – मंगळवेढ्याची बासुंदी उद्योगविश्व – मंगळवेढ्याची बासुंदी
>>अश्विन बापट मंगळवेढ्याच्या माळी कुटुंबीयांचा बासुंदीचा चार पिढ्यांचा व्यवसाय असून त्यांच्या बासुंदीला मागणी वाढत आहे. भविष्यात बासुंदीमध्ये अंगूर बासुंदी, सीताफळ...
पश्चिमरंग – शूमनचा कार्नवल
सरकारी घर घेऊनही निकम यांनी हॉटेलची बिले उकळली! सचिन सावंत यांनी सादर केली बिले
गुलदस्ता – आवडत्या माणसाला भेटण्याची आस
सृजन संवाद- रामराज्य – रामाच्या कल्पनेतले!
कायदेशार सल्ला – परस्पर संमतीने घटस्फोट महत्त्वाचा
मागोवा – अभिव्यक्तीचे वारे…