शिवसेनेच्या नेतेपदी अंबादास दानवे

शिवसेनेच्या नेतेपदी अंबादास दानवे

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दानवे यांना नगरसेवक ते विधान परिषद विरोधी पक्षनेते पदापासून लोकसभा निवडणुकीचा प्रदीर्घ अनुभव असून गेल्या अनेक वर्षांपासून ते शिवसेनेच्या माध्यमातून राजकारणात सक्रिय आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेनेच्या महत्त्वाच्या पदांच्या नियुक्त्या जाहीर केल्या. ऑक्टोबर 2004 मध्ये त्यांच्यावर प्रभारी जिल्हाप्रमुखपदाची जबाबदारीही सोपवण्यात आली. यानंतर शिवसेनेच्या माध्यमातून ते विधान परिषद विरोधी पक्षनेतेपदी जबाबदारी यशस्वीरीत्या सांभाळत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने त्यांची नियुक्ती करण्यात आल्याचे शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविले आहे.

 

निर्मला गावीत शिवसेनेच्या उपनेतेपदी

नाशिकच्या निर्मला गावीत यांची शिवसेनेच्या उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. निर्मला गावीत या नाशिकच्या इगतपुरी, त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघातून दोन वेळा निवडून आल्या आहेत. दिवंगत माजी केंद्रीय मंत्री माणिकराव गावीत यांच्या त्या कन्या आहेत.

 

अवधेश शुक्लांवर राज्य संघटपदाची जबाबदारी 

सामाजिक कार्यात सक्रिय असणारे पंडित अवधेश हरिशंकर शुक्ला यांची राज्य संघटकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्ध दिलेल्या पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरेंबद्दल काय म्हणाले होते?; संजय राऊत यांचा गौप्यस्फोट काय? देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरेंबद्दल काय म्हणाले होते?; संजय राऊत यांचा गौप्यस्फोट काय?
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दलचा मोठा गौप्यस्फोट केला आहे. फडणवीस हे राज ठाकरे यांना काय म्हणायचे...
मिस्टर राज… टीकेनंतर सुषमा अंधारेंचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर; रमेश किनी हत्याकांडाचा उल्लेख करत म्हणाल्या…
अजित पवारांना शरद पवार ‘व्हिलन’ बनवत होते, कारण… देवेंद्र फडणवीस यांचा मोठा गौप्यस्फोट
‘घरोघरी मातीच्या चुली’मधील ऐश्वर्या-सारंगच्या लग्नातील पैठणी थीमची चर्चा
Amitabh Bachchan : विवाहित असतानाही ‘या’ अभिनेत्यासोबत होतं अमिताभ बच्चन यांच्या लेकीचं अफेअर!
स्टार प्रवाहवरील ‘ही’ लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; अनेकांची निराशा
‘या’ अभिनेत्रींनी मोडला श्रीमंत पुरुषांचा संसार, त्यानंतर केलं लग्न, एकीची सवत तर प्रसिद्ध अभिनेत्री