सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार, तीन राऊंड फायर करून हल्लेखोर पसार

सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार, तीन राऊंड फायर करून हल्लेखोर पसार

बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या वांद्रे येथील घराबाहेर गोळीबार झाला आहे. रविवारी पहाटेच्या सुमारास हल्लेखोरांनी तीन राऊंड फायर केले. गोळीबार करून हल्लेखोर पसार झाल्याचे वृत्त माध्यमांनी दिले.

मिळालेल्या माहितीनुसार, दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी पहाटे पाचच्या सुमारास सलमान खानच्या वांद्रे येथील घराबाहेर गोळीबार केला. गोळीबारानंतर हल्लेखोर पसार झाले असून याची माहिती मिळताच पोलिसांच्या गुन्हे शाखेने घटनास्थळी धाव घेतली. सलमानला याआधीही जीवे मारण्याच्या धमक्या मिळालेल्या असून गोळीबाराच्या घटनेनंतर त्याच्या घराबाहेर पोलीस सुरक्षा वाढवण्यात आली आहे. तसेच पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपसात आहे.

सलमान खान याला कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई गँगने याआधी अनेकदा जीवे मारण्याची धमकी दिली आहे. सलमानला मारणे हेच आमचे लक्ष्य असल्याचे त्याने एका मुलाखतीत जाहीरपणए सांगितले होते. याच लॉरेन्स बिश्नोईने सलमानच्या जवळचा समजला जाणारा अभिनेता व गायक गिप्पी ग्रेवाल कॅनडामध्ये हल्ला केला होता. तसेच सलमानलाही धमकीचे मेल पाठवले होते. त्यानंतर मुंबई पोलिसांनी सलमानच्या सुरक्षेत वाढ करत त्याला वाय प्लस सुरक्षा देण्यात आली होती.

दरम्यान, गेल्या वर्षी सलमान खानला एक धमकीचा मेल आला होता. सलमानचा जवळच्या प्रशांत गुजाळकर याला रोहित गर्गकडून हा धमकीचा मेल आला होता. याप्रकरणी पोलिसांनी भादवि कलम 506 (2), 120 आणि 34 अंतर्गत गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई, गोल्डी ब्रार आणि रोहित गर्ग यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आता सलमानच्या घराबाहेर गोळीबार झाल्याने खळबळ उडाली असून पोलीस आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाले आहे. पुढील तपास सुरू आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘बेकायदेशीर होर्डिंग कोणाच्या मेहेरनजरनं?’; घाटकोपरच्या दुर्घटनेवर बोलताना वर्षा गायकवाड संतापल्या ‘बेकायदेशीर होर्डिंग कोणाच्या मेहेरनजरनं?’; घाटकोपरच्या दुर्घटनेवर बोलताना वर्षा गायकवाड संतापल्या
मुंबईच्या घाटकोपरमध्ये मोठी दुर्घटना घडली. घाटकोपरच्या छेडानगर येथे पेट्रोल पंपावर भलमोठं होर्डिंग कोसळलं. या दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला. तर...
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांचे निधन 
भाजप नेते सुशील कुमार मोदी यांचे निधन
कोपरगावमध्ये सायंकाळी 6 वाजेपर्यंत 65 टक्के मतदान; मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अनधिकृत होर्डिंग्ज वरून पालिका आणि रेल्वे प्रशासनाला ढकलाढकलीचा कारभार
लूटालूट! उद्या संजय राऊत करणार नाशिक महानगरपालिकेतील 800 कोटींच्या घोटाळ्याची पोलखोल
Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : बारामती निवडणुकीचे EVM असलेल्या स्ट्राँग रुममधील CCTV 45 मिनिटं बंद, पाहा व्हिडीओ